दहावीनंतर होता येणार डॉक्टर; साडेसात वर्षांचा अभ्यासक्रम

दहावीनंतर होता येणार डॉक्टर; साडेसात वर्षांचा अभ्यासक्रम

डॉक्टर होण्याची स्वप्नं पाहणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. कारण आता विद्यार्थ्यांना दहावीचे शिक्षण पूर्ण झाले की, लगेच डॉक्टर होता येणार आहे. आयुर्वेदिक डॉक्टर बनण्याचा मार्ग सुकर झाला असून, दहावीनंतर विद्यार्थी बीएएमसी डॉक्टर बनू शकतात. हा अभ्यासक्रम साडेसात वर्षांचा असणार आहे. सामायिक प्रवेश परीक्षेत (सीईटी) एमबीबीएसची जागा मिळाली नाही, तर आयुर्वेद किंवा इतर भारतीय वैद्यकीय – उपचार पद्धतीच्या अभ्यासाकडे जाणाऱ्यांची संख्या कर्नाटकसारख्या राज्यामध्ये वाढत चालली आहे.

भारतीय वैद्य पद्धत राष्ट्रीय आयोगाने दहावीनंतर थेट पदवी प्रवेशाची संधी दिली आहे. याबाबत गतवर्षी नियम तयार करून त्याबाबत आक्षेप मागवले होते. त्यावर दाखल केलेल्या आक्षेप, सल्ला, सूचनांचा विचार करून – नियमांना अंतिम स्वरूप देण्यात आले आहे. याबाबतची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. ‘प्री- आयुर्वेद प्रोग्रॅम फॉर आयुर्वेद मेडिसीन अँड सर्जरी रेग्युलेशन्स 2024’ असे या नियमावलीचे नामकरण करण्यात आले आहे. दहावी उत्तीर्ण झालेल्यांना या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता येणार आहे.

साडेसात वर्षांचा अभ्यास पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना ही पदवी मिळेल. पहिली दोन वर्षे प्री आयुर्वेद प्रोग्रॅम (पीएपी) असेल. साडेचार वर्षे बीएएमएस पदवी अभ्यासक्रम असणार आहे. त्यानंतर एका वर्षासाठी सक्तीची इटर्नशिप असेल.

परीक्षा देण्यासाठी 75 टक्के हजेरीची सक्ती विद्यार्थ्यांना असून, प्रत्येक विषयाच्या तासिकेतदेखील 75 टक्के हजेरीची सक्ती असणार आहे. प्रायोगिक हजेरीसाठीही हाच नियम असेल. यासाठी वर्षाच्या अखेरीस वार्षिक परीक्षा घेतली जाईल. परीक्षेमध्ये किमान 50 टक्के गुणांची सक्ती असणार आहे. भारतीय वैद्य पद्धत अंतर्गत आयुर्वेद, युनानी, सिद्ध, होमिओपॅथी पदवी अभ्यासक्रमासाठी ‘नीट’ प्रवेश द्यावी लागते. आयुर्वेद पूर्व अभ्यासक्रमासाठी नीट-पीएपी द्यावी लागते. याकरीता ठरावीक गुणांची अट लागू करण्यात आली आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;