चिंचवडमधील तिरंगी लढतीत कोणाला धक्का ?

चिंचवडमधील तिरंगी लढतीत कोणाला धक्का ?

राज्यातील दुसऱ्या क्रमाकांचा मतदार संख्या असलेल्या चिंचवड विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढतीने चुरस निर्माण झाली आहे. तब्बल 3 लाख 87 हजार 520 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. 2019 च्या तुलनेत तब्बल 1 लाख 9 हजार 770 अधिक मतदान झाले आहे. वाढलेल्या मतदानामुळे महाविकास आघाडीचे राहुल कलाटे की भाजपचे शंकर जगताप यांना धक्का बसणार? हे शनिवारीच स्पष्ट होईल.

चिंचवड मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राहुल कलाटे, भाजपचे शंकर जगताप, अपक्ष भाऊसाहेब भोईर यांच्यासह 21 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे. मात्र, खरी लढत कलाटे जगताप आणि भोईर यांच्यात झाली आहे. चिंचवड मतदारसंघात 3 लाख 48 हजार 450 पुरुष, 3 लाख 15 हजार 115 महिला, 57 इतर असे 6 लाख 63 हजार 622 मतदार आहेत. यापैकी 2 लाख 3 हजार 781 पुरुष, 1 लाख 83 हजार 724 महिला, 15 इतर अशा 3 लाख 87 हजार 520 (58.39%) मतदारांनी मतदान केले.

2019च्या तुलनेत यंदा तब्बल 1 लाख 9 हजार 770 अधिक मतदान झाले. चिंचवड मतदारसंघात वाकड, पुनावळे, काळेवाडी, थेरगाव, रावेत या भागातून राष्ट्रवादीचे राहुल कलाटे यांना अधिक मतदान होण्याचा अंदाज आहे. भाजपचे शंकर जगताप यांना सांगवी, नवी सांगवी, पिंपळे सौदागर, पिंपळे निलख, वाकडचा काही भाग, चिंचवडगावातील मतांवर त्यांची भिस्त आहे, तर अपक्ष म्हणून लढत असलेले भाऊसाहेब भोईर यांचा चिंचवड, बिजलीनगर हा बालेकिल्ला आहे.

दोन-सव्वा दोन लाख मतदान घेणारा उमेदवार विजयी होणार

चिंचवड मतदारसंघात तब्बल 3 लाख 87 हजार 520 मतदारांनी आपला हक्क बजावला आहे. यामध्ये 2019च्या तुलनेत तब्बल 1 लाख 9 हजार 770 अधिक मतदान झाले आहे. त्यामुळे दोन ते सव्वा दोन लाख मते घेणारा उमेदवार विजयश्री खेचून आणेल, असा अंदाज राजकीय वर्तुळात व्यक्त केला जात आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;