कसबा बावड्यात शिंदे गटाविरोधात शिवसैनिक, काँगेस कार्यकर्ते आक्रमक; सतेज पाटील यांच्या शिष्टाईने अनर्थ टळला

कसबा बावड्यात शिंदे गटाविरोधात शिवसैनिक, काँगेस कार्यकर्ते आक्रमक; सतेज पाटील यांच्या शिष्टाईने अनर्थ टळला

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल करण्याच्या कारणावरून कसबा बावडा येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पदाधिकारी राहुल माळी यांना शिंदे गटाकडून शिवीगाळ करून अरेरावी केल्याने वादाला तोंड फुटले. तीन हजारांहून अधिकच्या जमावात आमदार सतेज पाटील, राजेश क्षीरसागर आणि सत्यजित कदम हजर असल्याने परिस्थिती हाताबाहेर जाण्याच्या शक्यतेने वातावरण तणावपूर्ण बनले होते. यावेळी सतेज पाटील यांनी संयमी भूमिका घेत कार्यकर्त्यांना शांत केले. यावेळी कसबा बावडा परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

रंकाळा विकासकामासाठी शिवसेना नेते व युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी निधी दिल्याबद्दल राजेश क्षीरसागर यांनी आभार व्यक्त केल्याचा जुना व्हिडीओ काल रात्री राहुल माळी यांनी सोशल मीडियावर व्हायरल केला होता. यावरून शिंदे गटाचे सुनील जाधव यांनी राहुल माळी यांना आज दुपारी शिवीगाळ करून दमदाटीचा प्रयत्न केला. याचवेळी राजेश क्षीरसागर आणि सत्यजित कदम येथे मतदान केंद्रांना भेटी देण्यासाठी आले होते. सतेज पाटील यांना माहिती समजताच ते अजिंक्यतारा कार्यालयातून कसबा बावडय़ात दाखल झाले. प्रसंगावधान ओळखून त्यांनी कार्यकर्त्यांना चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ एकत्र केले.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;