बारामतीत श्रीनिवास पवारांच्या शरयू मोटर्सची तपासणी, काहीच मिळाले नाही

बारामतीत श्रीनिवास पवारांच्या शरयू मोटर्सची तपासणी, काहीच मिळाले नाही

बारामती विधानसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार युगेंद्र पवार यांचे वडील श्रीनिवास पवार यांच्या मालकीच्या  शरयू मोटर्समध्ये निवडणूक आयोगाच्या फ्लाइंग स्कॉडकडून सोमवारी रात्री सर्च ऑपरेशन राबविण्यात आले. प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने येथे तपासणी करण्यात आली, परंतु काहीही आक्षेपार्ह आढळलेले नाही, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर यांनी दिली.

बारामतीत या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार अशी लढत होत आहे. त्यामुळे विधानसभा निवडणूक काळात शरयू मोटर्समध्ये झालेले हे सर्च ऑपरेशन चर्चेचा विषय ठरले आहे. याबाबत बारामतीचे निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर म्हणाले, निवडणुकीच्या काळात ज्या काही तक्रारी प्राप्त होतात, त्याअनुषंगाने तपासणी केली जाते. शरयू टोयाटो शोरूममध्येही तपास पथक गेले होते, परंतु त्या ठिकाणी रोकड किंवा अन्य काही आक्षेपार्ह आढळून आलेले नाही.

दरम्यान कर नाही त्याला डर कशाला. आम्हाला आता याची सवय झाली आहे. ते मोठे लोक आहेत, सत्तेत आहेत, अशी प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली, तर शरयू मोटर्समध्ये आम्ही फक्त व्यवसाय करतो. त्याचा रीतसर कर भरला जातो. आम्ही काही चुकीचे केले नाही तर घाबरू कशाला, असा सवालही श्रीनिवास पवार यांनी व्यक्त केला.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;