बहिणींनो, विचार करा… दीड हजार दिले, पण तुमच्याकडून घेतले किती हिशोब करा, शिर्डीत प्रियंका गांधी यांची प्रचंड सभा

बहिणींनो, विचार करा… दीड हजार दिले, पण तुमच्याकडून घेतले किती हिशोब करा, शिर्डीत प्रियंका गांधी यांची प्रचंड सभा

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार वेगळे आहेत. पण त्यांच्याविषयी मनात आदर आहे, असे काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी आज सांगितले. लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना दीड हजार रुपये दिले. पण दुसरीकडे टॅक्सच्या माध्यमातून राज्यातील जनतेकडून पैसा वसूल केला जात आहे. दहा वर्षांपासून केंद्रात भाजपचे सरकार आहे, मग निवडणुकीच्या तोंडावरच लाडकी बहीण योजना का, असा सवाल प्रियंका गांधी यांनी या वेळी केला.

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी प्रियंका गांधी यांची शिर्डीत पहिलीच निवडणूक प्रचारसभा झाली. या सभेत त्यांनी राज्य तसेच केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला. महाराष्ट्रातील अनेक उद्योग गुजरातला पळवले. यावरूनही त्यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्ला चढवला. मागील दहा वर्षांपासून महाराष्ट्रात भाजपचे सरकार आहे. त्यांनी महाराष्ट्राला कमजोर केले, असा आरोप त्यांनी केला.

 जातनिहाय जनगणना करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना जातनिहाय जनगणना करायला लावावी, असे आव्हान प्रियंका गांधी यांनी यावेळी दिले.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;