पथारीवाले धंगेकर यांच्या पाठीशी

पथारीवाले धंगेकर यांच्या पाठीशी

जाणीव संघटनाप्रणित हातगाडी, फेरीपथारी, स्टॉलधारक संघटनेने कसबा विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडी, इंडिया फ्रंट आणि मित्रपक्षांचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांना जाहीर पाठिंबा दिला. या संघटनेने गेल्या निवडणुकीतही धंगेकर यांना पाठिंबा दिला होता.

धंगेकर यांनी मंगळवारी लक्ष्मी रस्ता व परिसरातील हातगाडी, फेरीपथारी, स्टॉलधारक यांची भेट घेतली. तसेच संपूर्ण मार्गावरील विविध व्यापाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्याही समस्यांबाबत चर्चा केली. संघटनेचे अध्यक्ष श्वेता ओतारी, उपाध्यक्ष कैलास बोरणे, विभागीय अध्यक्ष विनायक दहीभाते, विभागप्रमुख अभिजित हत्ते, विभागप्रमुख संदीप यादव, विभागप्रमुख परवेज अन्सारी यांच्या स्वाक्षरीने हे पाठिंब्याचे पत्रक धंगेकर यांना देण्यात आले.

यावेळी हातगाडी, फेरीपथारी व स्टॉलधारक तसेच व्यापारी यांनी गेल्या दीड वर्षात धंगेकर यांनी त्यांचे अनेक प्रश्न सोडविल्याबद्दल धन्यवाद दिले.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;