फडणवीस सगळय़ात अपयशी गृहमंत्री

फडणवीस सगळय़ात अपयशी गृहमंत्री

महायुती सरकारच्या गेल्या अडीच वर्षांच्या काळात शिक्षण, आरोग्य व इतर कोणत्याही गोष्टीचा विकास झाला नाही. उलट राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडली असून बदलापूरसारख्या घटनांनी समाज अस्वस्थ झाला आहे. याला देवेंद्र फडणवीस जबाबदार असून, आजपर्यंत सगळ्यात अपयशी गृहमंत्री आहेत, असा आरोप सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी यांनी पत्रकार परिषदेत केला.

हमीभाव नसल्यामुळे शेतकरी अडचणीत आहेत. संविधान बदलण्याची भाषा भाजपच्या सहा नेत्यांनी केली आहे. तरीही भाजपचे नेते मान्य न करता, काँग्रेस फेक नॅरेटिव्ह पसरवत आहे, असे सांगण्यात येते. जनतेला दिशाभूल करण्याचे काम गेल्या दहा वर्षांत भाजपने केले आहे, असे चौधरी म्हणाले. काँग्रेस आणि मंडल आयोगामुळे ओबीसी आरक्षण मिळाले आहे. यासाठी फडणवीस आणि मोदी यांचे योगदान काय आहे, हे त्यांनी सांगावे. काँग्रेसने संविधान बचावासाठी वेळोवेळी आंदोलने केले आहे. परंतु देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या नेत्यांकडून संविधानाबाबत केल्या जाणाऱया वल्गना या खोटय़ा आहेत, असेही ते म्हणाले.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;