संतोष बांगरला अजिबात मते देणार नाही, निघा… बांगरच्या पत्नीला मतदारसंघातून हाकलून लावले

संतोष बांगरला अजिबात मते देणार नाही, निघा… बांगरच्या पत्नीला मतदारसंघातून हाकलून लावले

गद्दार गँगचा सदस्य असलेले हिंगोली जिह्यातील कळमनुरी मतदारसंघातील मिंधे गटाचे उमेदवार संतोष बांगरला नागरिकांनी जबरदस्त तडाखा दिला. मते मागण्यासाठी गेलेल्या आमदार संतोष बांगर यांच्या पत्नीला मतदारांनी गावातून हाकलून लावले. संतोष बांगरला आम्ही अजिबात मते देणार नाही, चला येथून निघा, अशा शब्दांत गावकऱयांनी सुनावले. या संबंधीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. बांगर यांच्या पत्नी एका घरी जातात आणि तिथल्या नागरिकांना सांगतात की, 20 तारखेला धनुष्यबाणाला मतदान करायचं आहे, तेवढय़ात तिथे उपस्थित असलेली एक व्यक्ती म्हणते, ‘नाही…नाही…नाही देणार आम्ही तुम्हाला मते.’ तेवढय़ात प्रचाराला आलेल्या कार्यकर्त्यांनी तिथून काढता पाय घेतला. या व्हिडीओमुळे चांगलीच खळबळ उडाली आहे.

माझा उमेदवारी अर्ज दाखल करताना मोठे शक्तीप्रदर्शन करावे, यासाठी मिळेल तेवढय़ा गाडय़ा आणाव्यात, असे संतोष बांगर यांनी जिह्यातील बाहेरगावी असलेल्या मतदारांना मतदानादिवशी गावात आणण्यासाठी पह्न पे करा, म्हटले होते.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;