बदनामीच्या राजकारणाला लोक उत्तर देतील; पैसे वाटल्याच्या आरोपाला रोहित पाटील यांचे प्रत्युत्तर

बदनामीच्या राजकारणाला  लोक उत्तर देतील; पैसे वाटल्याच्या आरोपाला रोहित पाटील यांचे प्रत्युत्तर

तासगाव विधानसभा मतदारसंघातील एका गावात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार रोहित पाटील यांचे कार्यकर्ते दिवाळी फराळाच्या बॉक्समध्ये पैसे वाटत असल्याचा गंभीर आरोप रविवारी माजी खासदार संजयकाका पाटील यांनी केला. या आरोपांचे खंडन करत रोहित पाटील यांनी संजयकाका यांना आज प्रत्युत्तर केले. बदनामीच्या राजकारणाला लोक उत्तर देतील, असे रोहित पाटील म्हणाले.

रोहित पाटील म्हणाले, ‘‘पाच वर्षे काम करणाऱयाला असल्या गोष्टी करायची गरज नसते. मी पाच वर्षे काम केले आहे हे लोकांना माहीत आहे. अशा पद्धतीने बदनामीचे राजकारण कोण करत आहे हे लोकांना माहीत आहे. लोक त्याला उत्तर देतील.’’ ते पुढे म्हणाले, ‘‘माझे नाव घेण्यासाठी काय पराकोटीचे दडपण संबंधित व्यक्तीवर टाकले गेलेय. तासगाव-कवठे महांकाळ विधानसभा मतदारसंघात अशा पद्धतीचा प्रकार संजयकाका पहिल्यांदा करतात असेही नाही. ते कुठल्या पातळीला जातील हे लोकांना माहीत आहे आणि माझ्या लोकांना माझ्यावर विश्वास आहे.’’ दरम्यान, अजित पवार यांनी याआधी माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले होते. 70 हजार कोटी रुपयांचा सिंचन घोटाळ्याच्या चौकशीसाठी सही केली होती. आबांनी माझा केसाने गळा कापला होता. या वादग्रस्त विधानानंतर राज्यात याचे पडसाद उमटले होते.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;