पुण्यात टोळक्यांची दहशत, वाहनांची तोडफोड

पुण्यात टोळक्यांची दहशत, वाहनांची तोडफोड

ऐन दिवाळीत टोळक्याने दहशत माजवून वाहनांची तोडफोड  केल्याची घटना औंधमधील महापालिका वसाहतीत घडली. तसेच टोळक्याने महिलेसह तरुणावर शस्त्राने वारदेखील केले. याप्रकरणी चतुःशृंगी पोलिसांनी आठजणांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

याप्रकरणी साहिल पवार (20, रा. डॉ. आंबेडकर वसाहत, औंध) याने चतुःशृंगी पोलीस ठाण्यात तक्रार केली. त्यानंतर ओंकार नरवडे (20, रा. डॉ. आंबेडकर वसाहत, औंध), पियूष (21), नंदन (दोघे रा. पीएमसी वसाहत, औंध), आर्यन मोरे (20, रा. डॉ. आंबेडकर वसाहत, औंध) यांच्यासह आठजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच फरार आरोपींचा शोध घेण्यात येत आहे. टोळक्याने केलेल्या तोडफोडीत दहा दुचाकी आणि तीन रिक्षांचे नुकसान झाले.  तक्रारदार साहिल याच्याशी झालेल्या किरकोळ वादातून आरोपी महापालिका वसाहतीत आले. त्यांनी साहिल आणि त्याची आई दीपाली यांना शिवीगाळ केली. दीपाली यांना मारहाण करून त्यांच्यावर वार केले. त्यावेळी भांडणात मध्यस्थी करणाऱ्या सनी सोनवणे याच्यावर आरोपींनी वार केले.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;