आबांची मुलगी अजित पवारांवर संतापली

आबांची मुलगी अजित पवारांवर संतापली

70 हजार कोटींच्या सिंचन घोटाळय़ामधील चौकशीच्या फाईलवर राज्याचे माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी सही केली होती. पाटील यांनी मला अंधारात ठेवून माझा केसाने गळा कापला, असा गंभीर आरोप अजित पवार यांनी ऐन निवडणुकीत केल्याने आर. आर. पाटील यांची मुलगी स्मिता पाटील यांनी संताप व्यक्त केला आहे.

साडेनऊ वर्षांनंतर दादांनी आपल्या मनातील खदखद व्यक्त केली. खरे तर याविषयी मला दुःख आणि वाईट वाटत आहे. कारण आता बोलण्याची ही वेळ नव्हती. निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी खदखद बोलून दाखवली, असे स्मिता म्हणाल्या. दादांचे हे वक्तव्य करण्यामागे काय हेतू होता, काय दृष्टिकोन होता, हे मला खरेच माहीत नाही. आबांच्या पश्चात दादांनी आमचे पालकत्त्व स्वीकारले होते. माझ्या लग्नाच्या वेळी दादांनी पुढाकार घेतला होता, परंतु आता ते आबांविषयी असे का बोलले असावे हे मला माहिती नाही असे स्मिता म्हणाल्या. आबांबद्दल दुसरे कोणीही बोलले असते तर त्याचे इतके वाईट वाटले नसते. दादांना आम्ही वडिलांच्या जागी पाहतो. त्यांचा आदर करतो. अशा दादांनी आमच्या होमपीचवर असे वक्तव्य केल्याने मला खेद वाटत आहे, असे स्मिता यांनी म्हटले आहे.

आता विषय संपला!

आर.आर. पाटलांचा विषय माझ्यासाठी संपला आहे. माझ्या सदसद्विवेकबुद्धीला जे पटले ते बोललो, असे अजित पवारांनी स्पष्ट केले आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;