Maharashtra Assembly Election 2024 : पुण्यात राहुल गांधींचा रोड शो होणार

Maharashtra Assembly Election 2024 : पुण्यात राहुल गांधींचा रोड शो होणार

पुण्यात प्रचारासाठी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा रोड शो होणार आहे. पुणे शहर काँग्रेस समितीकडून याबाबत विनंती पत्र पाठवण्यात आले होते. त्याला राहुल यांनी होकार कळवला आहे. पुण्यात जाहीर सभेऐवजी राहुल यांचा रोड शो होईल. त्याची तारीख लवकरच निश्चित केली जाईल, असे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी सांगितले. महाविकास आघाडीच्या पुण्यातील सर्व उमेदवारांसाठी हा रोड शो असेल असेही त्यांनी नमूद केले.

शिराळ्यात भाजपला मोठा धक्का

शिराळा मतदारसंघात भाजपने सत्यजीत देशमुख यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर नाराजी उफाळून आली आहे. इच्छुक सम्राट महाडिक यांनी बंडाचे निशाण फडकवले असून अपक्ष म्हणून अर्ज भरणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. आज कार्यकर्त्यांचा मेळावा घेतल्यानंतर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. इस्लामपूर मतदारसंघात सम्राट यांचे बंधू राहुल महाडिक इच्छुक असून तेही अपक्ष अर्ज भरण्याच्या तयारीत आहेत.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;