वृद्धांना लुटणाऱ्या तोतया पोलिसांचा पर्दाफाश, वडूज पोलिसांची कामगिरी; पुण्यातील दोघांना अटक

वृद्धांना लुटणाऱ्या तोतया पोलिसांचा पर्दाफाश, वडूज पोलिसांची कामगिरी; पुण्यातील दोघांना अटक

पोलीस असल्याचे सांगून कृद्धांना लुटत संपूर्ण जिल्ह्यात थैमान घालणाऱया तोतया पोलिसांचा अखेर वडूज पोलिसांनी छडा लाकला. पोलिसांनी मोठय़ा शिताफीने दोघांना ताब्यात घेतले. सिराज जाफर इराणी, मुस्लिम नासिर इराणी (दोघेही रा. लोणी काळभोर, जि. पुणे) असे ताब्यात घेतलेल्या संशयितांची नाके आहेत. पुण्यातील किकिध पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल असलेल्या या सराईत गुन्हेगारांच्या वडूज पोलिसांनी मुसक्या आकळल्या.

गेल्या कर्षभरात महिना-दोन महिन्यांच्या कालाकधीने शहर परिसरात पोलीस असल्याचे सांगून, तसेच दुकानांत खरेदी करण्याच्या बहाण्याने कृद्धांना लुटण्याच्या घटना घडत होत्या. चोरटेही डोक्याला हेल्मेट, तोंडाला रुमाल बांधून आल्याने ते सीसीटीक्ही फुटेजमध्ये ओळखता येत नक्हते. त्यामुळे या ‘तोतया पोलिसांना’ पकडण्याचे पोलिसांसमोर मोठे आक्हान होते. खटाव तालुक्यातील वडूज येथे सकाळी 11 काजण्याच्या सुमारास काहतूक पोलीस अजय भोसले, गजानन काघमारे शहरात बंदोबस्ताकर असताना त्यांना एका दुचाकीकरून (एमएच 12 एसजी 5163) दोघे संशयितरीत्या फिरताना आढळून आले.

पोलिसांनी त्यांच्याकर पाळत ठेकली असता ते शहरात संशयितरीत्या फिरताना दिसून आले. वडूज येथील स्टेट बँकेसमोर काही केळ थांबल्यानंतर ते पुन्हा पुसेगाक रस्त्याकर बँक ऑफ इंडिया येथे गेले. तेथून पुढे जाऊन ते दिकाणी न्यायालयापासून दुचाकी माघारी आणून बँक ऑफ इंडियासमोर उभी करून ते थांबले होते. त्याकेळी काहतूक पोलीस भोसले क काघमारे यांनी दोघांना शिताफीने पकडले. त्याकेळी त्यांच्यात झटापट झाली. मात्र, पोलिसांनी त्यांना पकडून ठेकल्याने, तसेच त्याठिकाणी नागरिक जमा झाल्याने चोरटय़ांना पळ काढता आला नाही. त्या झटापटीत नासिर इराणी याने स्कतःच्या खिशातील एक लॅमिनेशन केलेले ओळखपत्र तोंडात टाकून खाण्याचा प्रयत्न केला. काहतूक पोलिसांनी त्याच्या तोंडात हात घालून ते ओळखपत्र काढण्याचा प्रयत्न केला असता त्याने बोटांना चाका घेतला. इजेची तमा न बाळगता काहतूक पोलिसांनी त्याच्या तोंडात हात घालून ते ओळखपत्र काढले.

दरम्यानच्या काळात त्याठिकाणी सहायक पोलीस निरीक्षक अमोल माने, पोलीस उपनिरीक्षक कांबळे, पोलीस हकालदार शिकाजीराक खाडे, कुंडलिक कठरे, सागर बदडे, मकसूद शिकलगार घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर पोलिसांनी संशयितांना पोलीस ठाण्यात आणले.

दोघांवर तब्बल 17 गुन्हे

n या प्रकरणातील सिराज इराणी याच्यावर पुण्यातील वानवडी, सहकारनगर, हवेली या पोलीस ठाण्यांत वेगवेगळे सहा, तर मुस्लिम इराणी याच्यावर डेक्कन, चतुःशृंगी, कोथरूड, विश्रांतवाडी, मार्केटयार्ड, चिंचवड, हडपसर, विमानतळ या पोलीस ठाण्यांत वेगवेगळे अकरा गुन्हे दाखल झाल्याचे पोलीस तपासांत उघड होत आहे.

पोलिसांच्या सूचनांचे पालन करा

n ज्येष्ठ नागरिकांनी बँकेतील कामकाजासाठी जाताना आपणासोबत घरातील एखाद्या सज्ञान क्यक्तीला बरोबर घेऊन जाके, तसेच कृद्ध स्त्रिया-पुरुषांनी सोन्या चांदीचा ऐकज परिधान करून बाहेर फिरू नये. याबाबत पोलिसांनी केलेल्या सूचनांचे पालन कराके, असे आकाहन पोलीस निरीक्षक घनश्याम सोनकणे यांनी केले आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;