प्राथमिक शाळेतील मुलांना बेदम मारहाण प्रकरण, सहायक शिक्षिका निलंबित, मुख्याध्यापकांची केली बदली

प्राथमिक शाळेतील मुलांना बेदम मारहाण प्रकरण, सहायक शिक्षिका निलंबित, मुख्याध्यापकांची केली बदली

सांगली महानगरपालिकेच्या 29 नंबरच्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना जबर मारहाण केल्याबद्दल सहायक शिक्षिका विजया शिंगाडे यांना निलंबित करण्याचा, तर प्रभारी मुख्याध्यापक मारुती माळी यांची बदली करण्याचा निर्णय सांगली मनपा आयुक्त डॉ. शुभम गुप्ता यांनी घेतला.

सांगली-मिरज आणि कुपवाड शहर महापालिका कार्यक्षेत्रातील प्राथमिक शाळा क्र. 29 मध्ये गुरुवारी (दि. 17) सहायक शिक्षिका विजया सुरेश शिंगाडे यांच्याकडून विद्यार्थ्यांना मारहाणीचा प्रकार घडला होता. याबाबत पालक व विद्यार्थ्यांनी तक्रार केली होती. या प्रकरणी सांगली मनपा उपायुक्त विजया यादव, सहायक आयुक्त सचिन सागावकर, शिक्षण प्रशासन अधिकारी रंगराव आठवले यांनी सदर प्रकरणी चौकशी केली. यामध्ये विद्यार्थ्यांना मारहाण झाल्याचे निष्पन्न झाले. ही बाब गंभीर स्वरूपाची असल्याने महापालिका आयुक्त डॉ. शुभम गुप्ता यांनी गंभीर नोंद घेऊन मुख्याध्यापक मारुती माळी यांची बदली, तर सहायक शिक्षिका विजया सुरेश शिंगाडे यांच्यावर निलंबनाची कारवाई केली.

शाळा प्रशासनास सूचना देऊन शालेय कामकाजात कोणत्याही प्रकारे बेशिस्तपणा खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा दिला. शालेय कामकाज नियमाने आणि शिस्तीत होणे आवश्यक आहे, त्याकामी प्रशासकीय अधिकारी यांनी सर्व मुख्याध्यापक आणि शिक्षक यांच्यात समन्वय साधून कामकाजात सुधारणा करावी, अशी सूचनाही त्यांनी दिली.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;