भाजपच्या उमेदवारीने मुखेड-कंधारमध्ये बंडखोरी, मुख्यमंत्र्यांचे खासगी सचिव अपक्ष म्हणून मैदानात

भाजपच्या उमेदवारीने मुखेड-कंधारमध्ये बंडखोरी, मुख्यमंत्र्यांचे खासगी सचिव अपक्ष म्हणून मैदानात

मुखेड-कंधार मतदारसंघात महायुतीमध्ये बंडखोरी उफाळली आहे. भाजपने विद्यमान आमदार तुषार राठोड यांना उमेदवारी देताच मुख्यमंत्र्यांचे माजी खासगी सचिव बालाजी पाटील खतगावकर यांनी अपक्ष उमेदवारीची घोषणा केली. दरम्यान, भाजप नेते माजी जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर, अशोकराव पाटील रावीकर, गुणवंत पाटील हंगरगेकर यांच्यासह अनेक भाजपा कार्यकर्त्यांनी खतगावकर यांचा प्रचार करणार असल्याचे म्हटले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे माजी खासगी सचिव बालाजी पाटील खतगावकर यांनी शासकीय पदाचा राजीनामा देऊन चार महिन्यांपूर्वी शिवसेना मिंधे गटात प्रवेश करून मुखेड-कंधार विधानसभा मतदारसंघावर दावेदारी ठोकली होती. तसेच मुखेड शहरात कार्यालय थाटून प्रचारही सुरू केला होता. अनेक मोठमोठे कार्यक्रम घेतले. मुख्यमंत्र्यांशी जवळचे संबंध असल्याने उमेदवारी मिळेल, असा खतगावकर यांचा कयास होता. तर दुसरीकडे भाजपचे विद्यमान आमदार तुषार राठोड गटात अस्वस्थता पसरली होती.  राठोड यांनी खतगावकरांच्या प्रचाराची मुख्यमंत्री व फडणवीस यांच्याकडे तक्रार केली होती. महायुतीने भाजपचे राठोड यांना उमेदवारी जाहीर करताच खतगावकर यांनी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात आमदार राठोड यांनी तालुक्याचा कुठलाही विकास केला नसल्याची टीका करत अपक्ष लढण्याची घोषणा केली.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;