एटीएम लुटले; पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग

एटीएम लुटले; पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग

गॅस कटरने एटीएम तोडून मोठी रक्कम चोरट्यांनी लंपास केली. सदरची घटना शुक्रवारी (दि. 18) मध्यरात्री 1 वाजता चाकण एमआयडीसी भागात बिरदवडी फाटा (ता. खेड) येथे घडली. या घटनेत चोरी करताना गॅस कटरमुळे एटीएम मशीन जळाले. एटीएम सेंटरमधून जाळ व धूर येत असल्याने परिसरातील नागरिकांच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर तत्काळ महाळुंगे पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. महाळुंगे पोलिसांच्या पथकाने अक्षरशः सिनेस्टाईलने 8 ते 10 किलोमीटर चोरट्यांच्या स्कॉर्पिओ मोटारीचा पाठलाग करून चोरट्यांना गाठले. मात्र चोरट्यांनी चोरीची 11 लाख 52 हजारांची रोकड आणि स्कॉर्पिओ मोटार गाडी जागेवर सोडून अंधाराचा फायदा घेत पोबारा केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

चाकण आंबेठाण रस्त्यावर बिरदवडी फाटा येथे हिताची सव्र्हिसेसमार्फत एटीएम सेंटर सुरू करण्यात आले आहे. शुक्रवारी रात्री चार-पाच जणांच्या टोळीने गॅस कटरने एटीएम मशीनचा दरवाजा कट केला. एटीएममधील ११ लाख ५२ हजारांची रोकड काढून घेतली. गॅस कटरमुळे आग लागली. एका नागरिकाने महाळुंगे एमआयडीसी पोलिसांना माहिती दिली.

गस्तीवर असलेले पोलीस शिपाई अमोल माटे व त्यांचे सहकारी सदर ठिकाणी पोहोचले. हिताची कंपनीचे एटीएम चोरट्यांनी फोडल्याचे लक्षात आले. त्यानंतर पोलीस हवालदार प्रकाश चापळे, पोलीस नाईक काळे, पोलीस शिपाई अमोल माटे, शिवाजी लोखंडे, गणेश गायकवाड, अशोक गभाले आदींनी येथून बाहेर पडण्याच्या मार्गावर ठिकठिकाणी नाकाबंदी केली. अमोल माटे व त्यांच्या सहकाऱ्यांना वाकी बाजूकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला वीटभट्टीच्या बाजूला एक काळी स्कार्पिओ थांबल्याचे दिसले. पोलिसांनी सदर गाडी अडवण्याचा प्रयत्न केला, मात्र भरधाव वेगात चोरट्यांनी पोलीस वाहनाला धडक देऊन मोटार चाकणकडे पलायन केले. पाठलाग करणाऱ्या पोलिसांनी चाकण आंबेठाण रस्त्यावर २ ठिकाणी कंटेनर आडवे लावून रस्ते बंद केले. रस्ता बंद केल्याने चोरटे पुन्हा माघारी फिरले. पोलीस मागावर असल्याने व रस्ते बंद असल्याने चोरट्यांनी झित्राईमळा भागात सदर स्कॉर्पिओ गाडी एका गल्लीमध्ये नेली.

पोलीस हवालदार बिराजदार व अमोल माटे यांनी याच गल्लीत पोलीस वाहन आणून उभे केले. गाडी काढता येणार नाही याची खात्री झाल्यानंतर चोरट्यांनी गाडी सोडून पोबारा केला. सदर स्कॉर्पिओमध्ये 5 ते 6 चोरटे असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी चोरट्यांना शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र ते अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले. चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना असल्याने सदरचे चोरट्यांचे वाहन आणि त्यातील 11 लाख 52 हजारांची रोकड चाकण पोलिसांच्या हवाली करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू होती. चाकण पोलीस अधिक तपास करीत आहेत.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;