पोलीस अलर्ट; अहिल्यानगरमध्ये 12 ठिकाणी नाकाबंदी

पोलीस अलर्ट; अहिल्यानगरमध्ये 12 ठिकाणी नाकाबंदी

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस दल सतर्क झाले असून, जिल्ह्याच्या सीमा असलेल्या भागांत 12 ठिकाणी नाकाबंदी (चेकपोस्ट) करण्यात आली आहे.

निवडणुकीच्या काळात अमली पदार्थ, मोठी रोकड, अवैध मद्य, शस्त्र्ाs यांचा जिह्यात पुरवठा होण्याची शक्यता गृहीत धरून संशयित वाहनांची 24 तास तपासणी केली जात आहे. 20 नोव्हेंबरपर्यंत हे चेकपोस्ट सुरू राहणार असल्याचे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले.

अहिल्यानगर जिल्ह्यातील 12 विधानसभा मतदारसंघांसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस ‘अलर्ट’ झाले आहेत. निवडणुकीमध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने प्रतिबंधात्मक कारवाईचा आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यानुसार कारवाई करण्यात येत आहे. तसेच आचारसंहितेचे पालन करण्यासाठी विविध पथके नियुक्त केली आहेत. पोलीस ठाणे हद्दीत नाकाबंदी, गस्त घालून व विशेष मोहीम राबवून जास्तीत जास्त करवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी सर्व प्रभारी अधिकाऱयांना दिले आहेत.

बाहेरच्या जिल्ह्यांतून नगर जिल्ह्यात अमली पदार्थ, मोठी रोकड, अवैध मद्य, अग्निशस्त्र्ाs येण्याची शक्यता गृहीत धरून जिह्याच्या सीमा असलेल्या भागांत 12 ठिकाणी चेकपोस्ट उभारण्यात आले आहेत. पोलिसांकडून वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. चेकपोस्टच्या ठिकाणी राहुटी लावण्यात आली असून, त्या ठिकाणी एक पोलीस अधिकारी व तीन अंमलदार तैनात आहेत.

वायरलेस यंत्रणा तैनात

n वायरलेस संदेश यंत्रणाही बसविण्यात आलेली आहे. नाकाबंदीच्या ठिकाणी स्वतः पोलीस अधीक्षक ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, सर्व पोलीस उपअधीक्षक यांच्यासह पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी भेटी देत आहे. नाकाबंदीदरम्यान अवैध मद्य, अमली पदार्थ, रोकड किंवा शस्त्र्ाs सापडल्यास संबंधित व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.

नाकाबंदी करण्यात आलेली ठिकाणे (कंसात पोलीस ठाणे)

n कऱहेटाकळी (शेवगाव), मिडसांगवी (पाथर्डी), साकत नाका (जामखेड), खेड (कर्जत), सुपा टोलनाका (सुपा), टाकळी ढोकेश्वर (पारनेर), काष्टी (श्रीगोंदा), नाऊर (श्रीरामपूर तालुका), कर्हे घाट (संगमनेर तालुका), आळे खिंड (घारगाव), येसगाव फाटा (कोपरगाव तालुका) व प्रवरा संगम (नेवासा).

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;