अजित पवारांना आणखी एक धक्का! सांगोल्याचे माजी आमदार दीपक साळुंके यांनी सोडली साथ

अजित पवारांना आणखी एक धक्का! सांगोल्याचे माजी आमदार दीपक साळुंके यांनी सोडली साथ

सोलापूर जिह्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला मोठी गळती लागली असून, सांगोल्यातील ज्येष्ठ नेते, माजी आमदार दीपक साळुंके-पाटील यांनी सर्व पदांचा राजीनामा देत अजित पवारांची साथ सोडली आहे. दरम्यान, माढ्याचे आमदार बबन शिंदे, मोहोळचे उमेश पाटील यांनी यापूर्वीच अजितदादांची साथ सोडली आहे. करमाळ्याचे आमदार संजय शिंदे हे अपक्ष लढण्यावर ठाम आहेत, तर मोहोळचे आमदार यशवंत माने व माजी आमदार राजन पाटील हेही अजित पवार यांची साथ सोडण्याची चर्चा तालुक्यात सुरू आहे.

सांगोल्यातील ज्येष्ठ नेते, माजी आमदार दीपक साळुंके-पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष होते. आज दुपारी त्यांनी जिल्हाध्यक्षपदासह सर्व पदांचा राजीनामा देत सांगोल्यातून विधानसभेची निवडणूक लढविण्याचा निर्णय जाहीर केला. दीपक साळुंके यांचा राजीनामा अजित पवार गटाला जबर धक्का मानला जात आहे. यापूर्वी माढ्याचे आमदार बबन शिंदे यांनी अजित पवारांची साथ सोडून विधानसभा निवडणूक ‘तुतारी’ घेऊन किंवा अपक्ष लढविण्याचा निर्णय जाहीर केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील हेसुद्धा राजीनामा देऊन ‘तुतारी’च्या संपर्कात आले आहेत.

करमाळ्याचे आमदार संजय शिंदे यांनी अजित पवार गटात न जाता अपक्ष म्हणूनच निवडणूक लढविण्याची तयारी केली आहे. सध्या मोहोळचे आमदार यशवंत माने व माजी आमदार राजन पाटील हे अजित पवार गटात असले तरी त्यांचीही भूमिका तळ्यात-मळ्यात असल्याचे चित्र आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत मोहोळचाही निर्णय होण्याची शक्यता आहे. सोलापूर जिह्यात यापूर्वी माढा, करमाळा, सांगोला तालुक्यांतील आजी-माजी आमदारांनी साथ दिली; परंतु ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ते बाहेर पडत असल्याने अजित पवार गटाला जबर धक्का मानला जात आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;