बीआरएस पक्ष राष्ट्रवादीत विलीन
भारत राष्ट्र समितीच्या (बीआरएस) नेत्यांनी राज्यात शेतकऱ्यांसह अनेक प्रश्नांवर उत्तम काम केलेले असून हेच काम पुढे सुरू ठेवण्यासाठी त्यांनी एकत्रितपणे निर्णय घेत राष्ट्रवादी पक्षाचा पर्याय निवडला. ते सर्व आज राष्ट्रवादीत सहभागी होत आहेत. त्यामुळे आजपासून तुम्ही आणि मी वेगळे नसून राज्याचा चेहरा बदलण्यासाठी एकत्रितपणे काम करू, अशी ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष, शरद पवार यांनी दिली.
राज्यातील बीआरएसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत ’राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार’ पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी ते बोलत होते. शहराध्यक्ष प्रशांत जगताप, खासदार सुप्रिया सुळे, प्रदेश प्रवक्ते अंकुश काकडे उपस्थित होते. यावेळी बीआरएसचे महाराष्ट्र समन्वयक बी. जी. देशमुख, माजी खासदार हरिभाऊ राठोड, नानासाहेब बाच्चाव, निखिल देखमुख, बाळासाहेब साळवे, महादेव बनसोडे, रुपेश पाटील यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी जाहीर प्रवेश केला.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List