हर्षवर्धन पाटील शरद पवारांबरोबर

हर्षवर्धन पाटील शरद पवारांबरोबर

माजी मंत्री व भाजपा नेते हर्षवर्धन पाटील भाजपला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश करणार असल्याची घोषणा केली. आपल्या प्रवेशाची तारीख वरिष्ठ नेते लवकरच जाहीर करतील, असे त्यांनी सांगितले. मागील चार-पाच दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर राजकीय भूमिकेसंदर्भात आपली दीड-दोन तास सविस्तर चर्चा झाली. चर्चेअंती इंदापूरची जागा महायुतीमधील घटक पक्षाला गेली आहे. विद्यमान आमदार ती लढवणार आहे. दुसरा पर्याय काढू असे ते चर्चेअंती म्हणाले. मात्र दुसऱया पर्यायाला कार्यकर्त्यांची संमती नव्हती. आपली ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याबरोबर सुमारे दीड तास सविस्तर चर्चा झाली.  पवारांनी सांगितले की, मी तालुक्याचा कानोसा घेतला आहे.   त्यानंतर मी सर्व कार्यकर्त्यांना विचारले. आपण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात जावे असा त्यांचा आग्रह होता. मी, माझे कार्यकर्ते, पदाधिकारी आम्ही सर्वजण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करत असल्याचे जाहीर करतो, असे हर्षवर्धन पाटील यांनी घोषित केले.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;