साडेतीन लाख शेतकऱयांचे ई-केवायसी पूर्ण, नगरमध्ये 5 लाख 30 हजार शेतकरी पात्र

साडेतीन लाख शेतकऱयांचे ई-केवायसी पूर्ण, नगरमध्ये 5 लाख 30 हजार शेतकरी पात्र

कापूस आणि सोयाबीन अनुदानासाठी राज्य सरकारच्या वतीने निकषानुसार पात्र असणाऱया नगर जिह्यातील 5 लाख 30 हजार शेतकऱयांपैकी 3 लाख 52 हजार 260 शेतकऱयांच्या खात्यांचे कृषी विभागाकडून ई-केवासी पूर्ण करण्यात आली आहे. दरम्यान, सोमवारपासून (दि. 30) सरकारच्या वतीने अनुदान वाटपास सुरुवात करण्यात आली आहे. जिह्यात अद्याप 1 लाख 78 हजार 391 शेतकऱयांच्या खात्याची ई-केवायसी बाकी असून, आठ दिवसांत ती पूर्ण करण्यात येणार आहे, अशी माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली.

मागील आठवडय़ात कापूस आणि सोयाबीन पिकांच्या मदतीसाठी राज्य सरकारने काही अटी शिथिल केल्या आहेत. यामुळे जिह्यातील 70 हजारांहून अधिक संयुक्त खाते असणारे शेतकरी या अनुदानासाठी पात्र ठरणार आहेत. यामुळे आधीच पाच लाख 30 हजार आणि आता नव्याने 70 हजार संयुक्त खातेदार असे जिह्यात जवळपास सहा लाख शेतकऱयांना कापूस आणि सोयाबीन अनुदानासाठी पात्र ठरणार असल्याचा कृषी विभागाचा अंदाज आहे.

राज्य सरकारने 2023 च्या खरीप हंगामात कापूस व सोयाबीन पिकांचे उत्पादन घेणाऱया शेतकऱयांना 0.2 हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट 1 हजार रुपये आणि दोन हेक्टरपर्यंत प्रती हेक्टर 5 हजार रुपयांचे अर्थसाहाय्य देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार नगरसह राज्यभर कृषी विभागाकडून माहिती संकलित करण्यात येत आहे. सामायिक खात्यांमध्ये आर्थिक मदतीचा लाभ घेण्यासाठी खातेदारांचे स्वयंघोषणापत्र दिल्यानंतर मदत थेट आधार संलग्न बँक खात्यात जमा होणार आहे. दरम्यान, कापूस अनुदानासाठी नगर जिह्यात 2 लाख 17 हजार 778 शेतकरी पात्र आहेत.

केवायसी पूर्ण झालेले तालुकानिहाय शेतकरी

n अकोले ः 21 हजार 645, जामखेड 19 हजार 840, कर्जत ः 7 हजार 192, कोपरगाव ः 27 हजार 969, नगर ः 17 हजार 616, नेवासा ः 46 हजार 56, पारनेर ः 24 हजार 465, पाथर्डी ः 31 हजार 639, राहाता ः 27 हजार 284, राहुरी ः 29 हजार 243. संगमनेर ः 31 हजार 681, शेवगाव ः 32 हजार 677, श्रीगोंदा ः 15 हजार 142, श्रीरामपूर ः 19 हजार 811.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;