काय सांगता! पुण्यात भंगारवाल्याकडे आयफोन 16!

काय सांगता! पुण्यात भंगारवाल्याकडे आयफोन 16!

पुणे तेथे काय उणे, असे म्हणतात ते उगीच नाही. आयफोन 16 लाँच होऊन अजून महिनासुद्धा झाला नाही. कंपन्यात लाखभर रुपये पगार असणारे अनेक जण महागडा आयफोन खरेदी करण्याचे स्वप्न बघत आहेत. परंतु पुण्यातील एका भंगारवाल्याकडे दोन-दोन आयफोन असल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या भंगारवाल्याने स्वतःसाठी 80 हजार रुपये किंमत असलेला आयफोन 16 खरेदी केला आहे, तर मुलासाठी दीड लाखाहून जास्त किंमत असलेला आयफोन 16 प्रो खरेदी केला आहे, असे व्हायरल व्हिडीओत हा भंगारवाला सांगत आहे.

मुलाला महागडा आयफोन

नवा कोरा ‘आयफोन 16’ हातात असलेला हा भंगारवाला पोटासाठी भंगार वेचण्याचे काम करतो. प्लास्टिकच्या पिशव्या, डबे, बाटल्या, जुनं सामान, फाटके कपडे असे तो जमा करण्याचे काम करतो. मुलाने दहावीत चांगले मार्क मिळवले तर त्याला आयफोन देईन, असे वचन दिले होते. सुदैवाने त्याने चांगले मार्क आणले. त्यामुळे त्याला दीड लाखांपेक्षा जास्त किंमतीचा आयफोन घेऊन दिल्याचे या भंगारवाल्याने सांगितले.

नेटकरी झाले अवाक्

भंगारवाल्याच्या हातात ‘आयफोन 16’ पाहून अनेकांनी आपल्या फोनकडे पाहिले आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी भन्नाट कमेंट केल्या आहेत. आयफोन खरेदी करण्यासाठी मुंबईसारख्या शहरात रांगा लागल्या होत्या. परंतु पुण्यातील भंगारवाल्याकडे आयफोन पाहून सोशल मीडियावर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;