वीज कर्मचारी आज, उद्या संपावर जाणार

वीज कर्मचारी आज, उद्या संपावर जाणार

वीज क्षेत्रातील खासगीकरण आणि पेन्शनसह विविध मागण्यांसाठी महानिर्मिती, महापारेषण, महावितरण कंपन्यांमधील सर्वच कर्मचारी, अभियंते, अधिकारी आणि कंत्राटी वीज कामगार दि. 25 ते 26 सप्टेंबर रोजी 48 तासांच्या संपावर जाणार आहेत. हा संप यशस्वी करण्याचा तिन्ही कंपन्यांमधील कर्मचारी संघटनांनी निर्णय घेतला आहे.

महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी, अभियंते, अधिकारी कृती समितीतर्फे राज्य शासनाला संपाची नोटीस दिली आहे. वीज वितरणाचा परवाना क वीज कंपन्यांच्या खासगीकरणाबाबत उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी चर्चा केली होती. त्यावेळी त्यांनी वीज कंपन्यांचे खासगीकरण करणार नाही, असे आश्वासन दिले होते. त्यानंतरही वीज कंपन्यांमध्ये खासगीकरण सुरूच आहे. 16 जलविद्युतनिर्मिती केंद्रे सर्वात कमी खर्चात वीजनिर्मिती करत आहेत. त्या संचाचे आधुनिकीकरण क नूतनीकरणाच्या नाकाखाली खासगी भांडवलदारांच्या ताब्यात देण्याचा निर्णय कॅबिनेट बैठकीत घेण्यात आला. महापारेषण कंपनीच्या व्यवस्थापनाने 200 कोटींवरील प्रकल्प खासगी उद्योजकांना उभारणी, चालवणे व देखभाल-दुरुस्तीसाठी देण्याचा निर्णय घेतला आहे. या खासगीकरणाला कर्मचारी, अभियंते, अधिकाऱयांचा तीक्र विरोध आहे.

तसेच केंद्र आणि राज्य सरकारी कर्मचाऱयांप्रमाणे तीन वीज कंपन्यांमधील कर्मचारी, अभियंते, अधिकाऱयांनाही सुधारित पेन्शन योजना लागू करावी, वीज कंपन्यांमधील रिक्त जागा त्वरित भराक्यात, या मागण्यांकडे लक्ष वेधून घेण्यासाठी दि. 25 व 26 सप्टेंबर रोजी वीज कर्मचाऱयांनी संप पुकारला आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;