नगर महापालिकेच्या सार्वजनिक कामांमध्ये 60 कोटींचा भ्रष्टाचार, शिवसेनेचे योगीराज गाडे यांचा आरोप

नगर महापालिकेच्या सार्वजनिक कामांमध्ये 60 कोटींचा भ्रष्टाचार, शिवसेनेचे योगीराज गाडे यांचा आरोप

नगर शहरात सुरू असलेल्या सार्वजनिक कामांमध्ये 60 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नगर महापालिकेतील माजी नगरसेवक योगीराज गाडे यांनी केला आहे. गाडे यांनी आयुक्त यशवंत डांगे यांना पत्र लिहून या भ्रष्टाचाराबाबत तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.

योगीराज गाडे यांनी पत्रात असे नमूद केले आहे की, शहरात सध्या महापालिकेकडून ड्रेनेज, काँक्रीट रस्ते, डांबरी रस्ते इत्यादी कामे सुरू आहेत. परंतु, या कामांमध्ये शासकीय योजना व मंजूर अंदाजपत्रकानुसार कामे होत नसल्याचे दिसून आले आहे. या कामात रस्त्यांची मापे कमी केली जात आहेत. स्टीलच्या जाळ्यांचा वापर केला जात नाही. काँक्रीटच्या रस्त्यांसाठी प्लॅस्टिक पत्रे वापरले जात नाहीत. पातळी अंदाजपत्रकातील मापदंडानुसार नाही आणि निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरले जात आहे. या सर्व त्रुटींच्या आधारे अंदाजे 60 कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा अंदाज गाडे यांनी व्यक्त केला आहे. करदात्यांच्या पैशांचा हा गैरवापर गंभीर असून, त्यावर तातडीने उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे, असे गाडे यांनी म्हटले आहे.

कामांना दर्जा नाही

n नगर शहरामध्ये अनेक ठिकाणी रस्त्यांची कामे सुरू आहेत; पण त्याचा दर्जा हा राखला जात नाही, असा आरोप केला जात आहे. नागरिकांनीही आता या सर्व बाबींकडे लक्ष द्यावे व जिथे नियमांचे उल्लंघन केले आहे, तेथे प्रशासनाने कारवाई करावी, असे आवाहन योगीराज गाडे यांनी केले आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;