पत्नी नांदायला येत नाही म्हणून मेव्हण्याच्या मुलाचा खून, श्रीरामपूर पोलिसांनी पाच दिवसांच्या तपासानंतर मुलाचा मृतदेह शोधला

पत्नी नांदायला येत नाही म्हणून मेव्हण्याच्या मुलाचा खून, श्रीरामपूर पोलिसांनी पाच दिवसांच्या तपासानंतर मुलाचा मृतदेह शोधला

पत्नी नांदायला येत नाही म्हणून मेव्हण्याच्या मुलाचा गळा आवळून खून करण्यात आला. याबाबत आरोपी पोलिसांची दिशाभूल करीत असल्याने मृतदेह सापडत नव्हता. अखेर पाच दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर त्या तीन वर्षांच्या मुलाचा मृतदेह श्रीरामपूरच्या पोलिसांनी वैजापूर तालुक्यातील गारद परिसरात मक्याच्या शेतातून शोधून काढला.

श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशनमध्ये मुलाच्या अपहरणाचा गुन्हा दाखल झाला होता. अपहरण करणाऱया त्या नातेवाईकाचा श्रीरामपूर पोलीस शोध घेत होते. अपहरण करणारा तरुण पोलिसांच्या हाती लागला. मात्र, मुलाबाबत माहिती देण्यात टाळाटाळ करीत होता. अखेर पोलिसांनी खाक्या दाखवताच, मुलाचा खून केल्याची कबुली दिली. मात्र, मृतदेहाबाबत पोलिसांची दिशाभूल करीत होतो.

श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक संदीप मुरकुटे, राजेंद्र त्रिभुवन, चाँद पठाण यांचे पथक आरोपी राहुल पोपट बोधक (रा. चांदेगाव, ता. वैजापूर) याला ताब्यात घेण्यासाठी वैजापूरकडे गेले. आरोपीचे मोबाईल लोकेशन व जागोजागी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, आरोपी शिवार बंगला (ता. वैजापूर) हद्दीत असल्याची माहिती मिळाली. आरोपीने पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी मोबाईल एका झुडपात टाकून दिल्यामुळे आरोपीचा शोध लागत नव्हता. त्यातच अपहरण झालेल्या मुलाचा शोध घेणे पोलिसांसमोर आव्हान होते. पोलिसांचे पथक घराजवळ रात्रभर दबा धरून बसले होते. आरोपी राहुल घरी येताच त्याला ताब्यात घेतले.

राहुलकडे मुलाबाबत चौकशी केली असता, शिवार बंगला ते बटना आवरा या भागातील मक्याच्या शेतात मुलाचा मृतदेह फेकून दिल्याची माहिती त्याने दिली. पोलीस पथकाने या भागातील वीस किलोमीटर परिसरात येणाऱया मक्याच्या शेतात शोध घेतला; परंतु मुलाचा मृतदेह सापडला नाही. आरोपी दिशाभूल करीत असल्याने पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण व सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, आरोपी व अपहरण झालेला मुलगा शिऊर बंगला चौकातील पेट्रोल पंपावर सीसीटीव्ही फुटेजमध्ये आढळून आले.

पोलीस पथकाने त्या ठिकाणापासून विरुद्ध दिशेने तपास सुरू केला. शिऊर बंगला ते संभाजीनगर जाणाऱया रोडने गारद या भागापर्यंत अपहरण झालेला मुलगा आरोपीसोबत सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत होता. आरोपीने अपहरण झालेल्या मुलाचा गारद शिवारात खून केल्याचा अंदाज बांधून त्या दिशेने तपास सुरू केला. गारद (ता. वैजापूर) शिवारात गळा दाबून मृतदेह टाकून देण्यात आला. मृतदेह पोलिसांना सापडल्यानंतर आरोपी राहुल बोधक याच्या विरोधात खुनाचा गुन्हा वाढविण्यात आला.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;