मोदी, शहा यांच्यात राष्ट्रभक्तीचे नव्हे, व्यापारी रक्त! शिवसेना नेते संजय राऊत यांचा हल्लाबोल

मोदी, शहा यांच्यात राष्ट्रभक्तीचे नव्हे, व्यापारी रक्त! शिवसेना नेते संजय राऊत यांचा हल्लाबोल

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यात राष्ट्रभक्तीचे नव्हे, तर व्यापारी रक्त आहे. न्यायव्यवस्था, संसद व प्रशासन विकत घेऊन देशाला गुलाम करण्याचा प्रयत्न दोघांनी केल्याचा घणाघात शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांनी केला. ‘15 लाखांची जुमलेबाजी करणारे ‘लाडक्या बहिणी’ला 1500 रुपये देत आहेत; परंतु महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर 3000 रुपये देऊ,’ अशी घोषणा करीत ‘पंधरा सौ तुम्हारा, वोट हमारा!’ असे म्हणत संजय राऊत यांनी मिंधे सरकारलाही टोला लगावला. दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील शिवसैनिक व पदाधिकाऱयांच्या मेळाव्यात ते बोलत होते.

तारीख पे तारीख… न्यायव्यवस्था स्वतंत्र पाहिजे

‘देशाचे पंतप्रधान पांढरी टोपी घालून सरन्यायाधीशांच्या घरी जातात. सरन्यायाधीश कधीही राजकीय व्यक्तींना बोलावत नाहीत; पण मोदी मुख्य न्यायाधीशांच्या घरी गेले. आम्हाला न्याय कसा मिळणार? गेल्या तीन वर्षांपासून न्यायासाठी लढा देत आहोत. 50 खोके खाऊन सरकार आले, त्याचा खटला सुरू आहे; पण ‘तारीख पे तारीख’ का मिळत आहे. आता आम्हाला समजले.

मराठवाडय़ात मशाल पेटणारच

‘‘25 वर्षे शिवसेना-भाजपच्या युतीनंतर स्वार्थी भूमिका घेणाऱया भाजपला खोटेपणाचे नोबेल पारितोषिक दिले पाहिजे, ‘गरज सरो वैद्य मरो’ या भूमिकेतून भाजपने शिवसेनेचा वापर करून घेतला. मात्र त्यानंतर त्यांच्या स्वार्थी वृत्तीमुळे आम्ही युती तोडली, आता येणाऱया काळात मराठवाडय़ात मशाल पेटणारच, त्यासाठी सिद्ध व्हा,’’ असे जबरदस्त आवाहन शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी केले. राज्य संघटक एकनाथ पवार यांनी आयोजित केलेल्या शिवसंवाद मेळाव्यात ते बोलत होते.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;