डिलिव्हरी बॉईजच्या २५ जणांच्या टोळक्याचा पुनावळेतील सोसायटीत राडा

डिलिव्हरी बॉईजच्या २५ जणांच्या टोळक्याचा पुनावळेतील सोसायटीत राडा

सोसायटीमध्ये पार्सल देण्यासाठी आलेल्या डिलिव्हरी बॉयला पॅसेंजर लिफ्टचा वापर न करता सर्व्हिस लिफ्टचा वापर करण्यास सांगितल्याच्या कारणावरून डिलिव्हरी बॉयने त्याच्या 20-25 साथीदारांना घेऊन येत सोसायटीमध्ये राडा घातला. सुरक्षारक्षकासह चौघांवर दांडके, दगडाने मारहाण करत जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना शनिवारी (दि. 7) सकाळी साडेअकराच्या सुमारास पुनावळेतील पूना व्हिले सोसायटीत घडली. याप्रकरणी रावेत पोलिसांनी सात जणांना गजाआड केले आहे.

सुरक्षारक्षक मोहम्मद अशरफ मोहम्मद शफी (वय 27, रा. पुनावळे, मूळ- जम्मू-कश्मीर), सुपरवायझर प्रभाकर पांडे, एरिया सुपरवायझर ज्ञानदेव भोगील, सुरक्षारक्षक मेहबूब शेख अशी जखमींची नावे आहेत. मोहम्मद शफी यांनी रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मारुती परसराम वराडे (वय 20, रा. जांबे, ता. मुळशी), केदार जितेश बनसोडे (वय 19, रा. वाकड), गोपाल सिद्धेश्वर बोरावडे (वय 26, रा. पुनावळे), प्रियंकसिंग सुरेंद्रसिंग तोमर (वय 23, रा. हिंजवडी), रजाक इर्शाद खान (वय 25, रा. देहूरोड), सुनील विठ्ठल गवळी (वय 20, रा. जांबे, ता. मुळशी), सुनील सिद्धू बोधणे (वय 20, रा. मामुर्डी, ता. मावळ) अशी अटक आरोपींची नावे आहेत. राहुल गोपाळ बोरावडे आणि इतर 14 ते 15 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपी मारुती वराडे हा झेप्टो कंपनीचा डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतो. तो शनिवारी सकाळी पूना व्हिले सोसायटी येथे पार्सल देण्यासाठी आला. त्यावेळी तिथे नेमणुकीस असलेले सुरक्षारक्षक फिर्यादी शफी यांनी त्यास पॅसेंजर लिफ्टचा वापर न करता सर्व्हिस लिफ्टचा वापर करण्यास सांगितले. या कारणावरून आरोपी वराडेने चिडून त्याच्या इतर साथीदारांना बोलावून घेतले. आज याला संपवूनच टाकतो, असे म्हणून दोघांनी फिर्यादीच्या डोक्यात लाकडी दांडक्याने मारहाण करून त्यांना गंभीर जखमी केले. इतर पाच ते सहा जणांनी फिर्यादी यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. हे भांडण सोडविण्यासाठी सुपरवायझर पांडे आले असता त्यांनादेखील आरोपींनी दगडाने, लाथाबुक्क्यांनी तसेच एरिया सुपरवायझर ज्ञानदेव भोगील व सुरक्षारक्षक मेहबूब शेख यांनादेखील 15 ते 20 जणांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. फौजदार राहुल खिळे याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;