जुगार छाप्यात जप्त केलेले पावणेआठ लाख पोलीस अधिकाऱ्यानेच केले गायब, गुन्हा दाखल होताच ‘तो’ अधिकारी फरार

जुगार छाप्यात जप्त केलेले पावणेआठ लाख पोलीस अधिकाऱ्यानेच केले गायब, गुन्हा दाखल होताच ‘तो’ अधिकारी फरार

सहा वेगवेगळ्या जुगारअड्ड्यांवर छापा टाकून पोलीस अंमलदारांनी जप्त केलेल्या 7 लाख 85 हजार 969 रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी सांगोल्याचे सहायक फौजदार तथा तत्कालीन मुद्देमाल, नगदी कारकून अब्दुल लतिफ अमरुद्दीन मुजावर यांच्यावर सांगोला पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हा दाखल होताच, सहायक फौजदार फरार झाले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी तथा सहायक फौजदार अब्दुल मुजावर हे सांगोला पोलीस ठाण्यात कार्यरत असताना सन 2016 ते 2020 या कालावधीत विविध अंमलदारांनी सहा वेगवेगळ्या जुगारअड्डय़ांवर टाकलेल्या छाप्यात 7 लाख 85 हजार 969 रुपये जप्त केले होते. या सर्व पैशांचा अपहार करण्यात आला. नगदी कारकून यांनी ही रक्कम विहित मुदतीत शासनास भरणा केली नसल्याची फिर्याद सहायक पोलीस निरीक्षक सचिन जगताप यांनी दिली. त्यानंतर 20 ऑगस्ट 2024 रोजी सहायक फौजदार अब्दुल मुजावर विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास मंगळवेढय़ाचे पोलीस निरीक्षक महेश ढवाण करीत असून, आरोपीच्या शोधासाठी त्यांनी विशेष पथक नेमले आहे. या पथकाने सोलापूर शहर व अक्कलकोट तालुका पिंजून काढला आहे. मात्र, आरोपीस पकडण्यास यश आले नाही. दरम्यान, शासकीय रकमेवर कायद्याचे रक्षणकर्त्या पोलीस अधिकाऱ्यानेच डल्ला मारल्याची चर्चा जोरात सुरू आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;