दुर्गा टेकडीवर नेऊन अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

दुर्गा टेकडीवर नेऊन अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

निगडी येथील दुर्गा टेकडीवर नेऊन 15 वर्षीय मुलीवर एका तरुणाने लैंगिक अत्याचार केला. यासाठी पीडित मुलीच्या 15 वर्षीय मैत्रिणीने आरोपी तरुणाला मदत केली. घडलेल्या प्रकरणाची वाच्यता केल्यास ठार मारण्याची धमकी दिल्याने मुलीने कोणास काही सांगितले नाही. मात्र, पीडित मुलगी दोन महिन्यांची गरोदर राहिल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. ही घटना 5 जुलै ते 9 ऑगस्ट या कालावधीत घडली.

पीडित 15 वर्षीय मुलीच्या आईने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सलीम (वय 22, रा. ओटा स्कीम,निगडी) आणि 15 वर्षीय मैत्रिणीविरोधात बाललैंगिक अत्याचारासह अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित मुलगी घरात एकटी असताना तिच्यावर अत्याचार करण्याच्या उद्देशाने ‘तू माझ्यासोबत दुर्गा टेकडी येथे चल; नाहीतर तुला व तुझ्या कुटुंबाला जीवे मारून कुटुंब संपवून टाकीन,’ अशी धमकी सलीम याने दिली. तिला बळजबरीने दुर्गा टेकडी येथे नेले. तेथे काही अंतरावर पीडित मुलीची 15 वर्षीय वर्गमैत्रीण थांबली. सलीमने मुलीवर तीन वेळा लैंगिक अत्याचार केला.

वर्गमैत्रिणीने पीडित मुलीला यासाठी भाग पाडले. सलीमने पीडित मुलीला घडलेल्या प्रकाराबाबत कोणास काही सांगितल्यास गळा दाबून ठार मारण्याची धमकी दिली. त्यामुळे मुलीने कुठेही वाच्यता केली नाही. मुलगी दोन महिन्यांची गरोदर राहिल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. सहायक पोलीस निरीक्षक कदम तपास करीत आहेत.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;