नगरमध्ये तीन शाळकरी मुलींची छेड काढल्याच्या घटनेने संताप; तोफखाना, भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यांत गुन्हा दाखल

नगरमध्ये तीन शाळकरी मुलींची छेड काढल्याच्या घटनेने संताप; तोफखाना, भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यांत गुन्हा दाखल

ठाणे जिह्यातील बदलापूर येथील घटनेबाबत आजही राज्यभरात संताप व्यक्त होत असतानाच नगर शहर व उपनगरांतील शाळा-महाविद्यालयांत शिक्षण घेणाऱ्या  तीन अल्पवयीन मुलींची छेड काढल्याचा प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पीडितांनी शनिवारी (24 रोजी) दिलेल्या फिर्यादीवरून विनयभंग, ‘पोक्सो’ कलमानुसार तोफखाना पोलीस ठाणे आणि भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

नगरमध्ये राहणाऱ्या अल्पवयीन मुलीने (वय 16) दिलेल्या फिर्यादीवरून गौरव बापू ठोंबे (रा. वंजार गल्ली, मंगल गेट, नगर) याच्याविरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी अल्पवयीन मुलीची गौरवसोबत ओळख असून, ते दोघे मित्र आहेत. मंगळवारी (20 रोजी) गौरवने मुलीला फोन करून बोलावून घेतले. दोघे एका हॉटेलमध्ये गेल्यानंतर गौरवने तिच्यासोबत लज्जा उत्पन्न होईल असे चाळे केले. ‘मला तुझ्याशी लग्न करायचे आहे. तू माझ्याशी लव्हशिप ठेवली नाहीस तर मी तुला जगू देणार नाही,’ असे धमकाविले. यानंतर तरुणीने तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

दुसऱ्या घटनेत नगर तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या अल्पवयीन मुलीने (वय 14) शनिवारी दिलेल्या फिर्यादीवरून चौघांविरुद्ध भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. आदित्य अनिल शिंदे (रा. गौतमनगर, भिंगार), रोहित राजू आल्हाट, शिवानंद मारुती बनसोडे (दोघे रा. वडारवाडी, भिंगार), प्रेम जाधव (रा. सोनिकनगर, भिंगार) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. फिर्यादी अल्पवयीन मुलगी 10 ऑगस्टला शाळा सुटल्यानंतर नगर-पाथर्डी रस्त्याने घरी जात असताना संशयित चौघांनी तिचा पाठलाग केला. तिला हातवारे करून लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पीडित मुलीने शनिवारी दुपारी कॅम्प पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलीस उपनिरीक्षक किरण साळुंके अधिक तपास करीत आहेत.

तिसऱया घटनेत अल्पवयीन मुलीने (वय 16) दिलेल्या फिर्यादीवरून मारुती आळकुटे (रा. वडारवाडी भिंगार) याच्याविरुद्ध भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अल्पवयीन मुलगी 19 ऑगस्ट रोजी आळकुटे याच्या दुकानात सुट्टे पैसे मागण्यासाठी गेली होती. यावेळी मागील भांडणाच्या कारणातून आळकुटे याने तिच्यासोबत लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले, असे फिर्यादीत म्हटले आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;