कोल्हापुरात दमदार पाऊस; राधानगरीचे दरवाजे उघडले

कोल्हापुरात दमदार पाऊस; राधानगरीचे दरवाजे उघडले

गेल्या महिन्याच्या अखेरीस उद्भवलेली महापुराची परिस्थिती ओसरून जनजीवन पुन्हा सुरळीत सुरू असताना, शुक्रवारपासून जिह्यात सर्वत्र पावसाने धडाका लावला. सलग तीन दिवस जिह्यात तुफान पाऊस सुरू आहे. रात्रंदिवस संततधार कोसळणाऱया पावसाने पंचगंगेच्या पातळीत तब्बल दहा फुटांहून अधिक वाढ झाली. जिकडे तिकडे पाणीच पाणी होऊन रस्त्यावरील खड्डय़ांचे मोठमोठे डबके तसेच सखल भागात साचलेल्या पाण्यातून जाताना सर्वांना मोठी कसरत करावी लागत होती. त्यामुळे जनजीवनावर काहीसा परिणाम जाणवू लागला.

आज सकाळी राधानगरी धरणाचा 6 क्रमांकाचा स्वयंचलित दरवाजा उघडला. त्यातून 2 हजार 928 क्युसेक विसर्ग सुरू होता. पाठोपाठ धरणाचे 3, 4, 5 क्रमांकांचे स्वयंचलित दरवाजे उघडले. त्यातून 5 हजार 712 आणि विद्युत गृहातून 1 हजार 500 असा एकूण 7 हजार 212 क्युसेक विसर्ग सुरू होता. आतापर्यंत जिह्यातील 16 बंधारे पाण्याखाली गेले असून, कर्नाटकातील अलमट्टीतून 42 हजार क्युसेक व हिप्परगीतून 22 हजार 251 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

पंचगंगा नदीवरील शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड, शिरोळ व रुकडी, वेदगंगा नदीवरील कुरणी, बस्तवडे व कासारी नदीवरील यवलूज असे बंधारे पाण्याखाली आहेत.

आज सकाळी 7च्या अहवालानुसार, आपल्या जिह्यातील धरणांमध्ये पुढीलप्रमाणे- (टीएमसी) पाणीसाठा आहे. राधानगरी 8.33 (टीएमसी), तुळशी  3.46, वारणा 31.25, दूधगंगा 22.73, कासारी 2.63, कडवी 2.44, कुंभी 2.57, पाटगाव 3.48, चिकोत्रा 1.34, चित्री 1.88, जंगमहट्टी 1.22, घटप्रभा 1.30, जांबरे 0.76, आंबेआहोळ 1.24 व कोदे लघु प्रकल्प 0.21 टीएमसी इतका पाणीसाठा आहे.

पंचगंगा नदीवरील राजाराम बंधारा 20.1 फूट, सुर्वे 19.9 फूट, रुई 46.3 फूट, इचलकरंजी 44 फूट, तेरवाड 39.9 फूट, शिरोळ 32.6 फूट, नृसिंहवाडी 30 फूट, राजापूर 21.7 फूट, तर नजीकच्या सांगली 11.9 फूट व अंकली 12.9 फूट अशी आहे. सायंकाळी चारच्या सुमारास पंचगंगेच्या पातळीत पावणेदोन फुटाने वाढ होऊन, पातळी 21 फूट 8 इंच झाली होती.

कोल्हापूर जिह्यात 24 तासांत 30.6 मि.मी. पाऊस

कोल्हापूर जिह्यात काल दिवसभरात गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 58.4 मि.मी. पाऊस पडल्याची नोंद झाली आहे, तर हातकणंगले 21.4, शिरोळ 13.1, पन्हाळा 29.3, शाहूवाडी 33.9, राधानगरी 42.6, करवीर 27, कागल 28.6, गडहिंग्लज 21.4, भुदरगड 37.3, आजरा 53.3 आणि चंदगड तालुक्यात 39.7 मि.मी. पाऊस पडल्याची नोंद आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;