प्रवरा नदीकाठी बाळासाहेब थोरात यांच्याकडून पूरस्थितीची पाहणी; समस्या जाणून घेतल्या

प्रवरा नदीकाठी बाळासाहेब थोरात यांच्याकडून पूरस्थितीची पाहणी; समस्या जाणून घेतल्या

प्रवरा,आढळा व म्हाळुंगी नदीच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या जोरदार पावसामुळे तिन्ही नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. सर्व नागरिकांनी पूरस्थिती काळात अधिक सतर्क राहावे, असे आवाहन काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले. त्यांनी रविवारी प्रवरा नदीकाठी जात पूरस्थितीची पाहणी करत स्थानिक नागरिकांशी संवाद साधला. प्रवरा नदीकाठी साईनगर, नाईकवाडपुरा व प्रवरासंगम येथे बाळासाहेब थोरात आणि नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांनी पूरस्थितीची पाहणी केली. यावेळी स्थानिक नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्याचबरोबर प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या.

आमदार थोरात म्हणाले की, धरणांच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने तिन्ही नद्यांची पाणी पातळी वाढली आहे. अशा काळामध्ये नागरिकांनी अधिक सतर्क रहावे. तरुणांनी नदीकाठी जाण्याचा किंवा सेल्फी घेण्याचा मोह टाळावा. याचबरोबर गणेशोत्सव काळातही अतिउत्साहीपणा न दाखवता अधिक काळजी घ्यावी, असे आवाहन केले. याचबरोबर स्थानिक सर्व नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. दुर्गाताई तांबे म्हणाल्या की, पूरस्थिती काळामध्ये तरुणांनी अति धाडस किंवा अति उत्साह दाखवू नये. त्याचप्रमाणे होणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी लहान मुलांनाही पालकांनी पाण्याकडे जाऊ देऊ नये तसेच तरुणांनी पाण्यामध्ये उतरण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन केले. या प्रसंगी साईनगर मधील नागरिकांना जाण्यासाठी उभारण्यात आलेल्या तात्पुरत्या पुलाची पाहणी ही आमदार थोरात यांनी केली.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;