कोथरुडजवळ हेलिकॉप्टर कोसळले; पायलट गंभीर, तिघे किरकोळ जखमी
मुंबईहून हैदराबादकडे निघालेले हेलिकॉप्टर खराब हवामानामुळे लॅण्ड करत असताना झाडावर आदळून कोसळल्याची घटना शनिवारी दुपारी कोथरूडजवळ पौडमधील कोंढावळे येथे घडली. अपघातात एक पायलट गंभीर जखमी आहे, इतर तिघे किरकोळ जखमी असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
संजय आनंद, एस.बी. राज (62, ठाणे), अमनदीप हरभजनसिंह खोकर (36, ठाणे), धिर भाटिया (मुंबई) अशी जखमींची नावे आहेत. यातील पायलट संजय आनंद हे गंभीर जखमी आहेत. ग्लोबल हेक्ट्रा कंपनीचे हे हेलिकॉप्टर होते.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List