डुप्लिकेट लायसन्ससाठी आरटीओकडून शुल्कवाढ

डुप्लिकेट लायसन्ससाठी आरटीओकडून शुल्कवाढ

डुप्लिकेट वाहन परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स) काढण्यासाठी आता नागरिकांना ज्यादा पैसे मोजावे लागणार आहेत. केंद्रीय परिवहन विभागाकडून ही शुल्क वाढ करण्यात आली असून, प्रत्येकी 400 रुपये अतिरिक्त मोजावे लागणार आहेत. यापूर्वी 258 रुपये शुल्क होते. नव्या दरानुसार आता 658 रुपये शुल्क आकारले जाणार आहे.

सार्वजनिक रस्त्यावर वाहन चालविण्यासाठी मोटार वाहन कायद्यानुसार ड्रायव्हिंग लायसन्स आवश्यक आहे. राज्यात दरवर्षी सरासरी दहा ते अकरा लाख नागरिक नवीन ड्रायव्हिंग लायसन्स काढतात. वाहनचालक लायसन्स हरवले, तुटले, खराब झाले, फोटो दिसेनासा झाला अशा विविध कारणांस्तव डुप्लिकेट लायसन्स काढतात. राज्यात दरवर्षी सरासरी दीड लाख नागरिक डुप्लिकेट ड्रायव्हिंग लायसन्स काढतात. मात्र, आता केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्ग परिवहन विभागाने डुप्लिकेट वाहन परवान्याचे (ड्रायव्हिंग लायसन्स) शुल्क वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य परिवहन विभागाने या निर्णयाची राज्यातील सर्व परिवहन कार्यालयांत अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच नॅशनल इन्फॉर्मेशन सेंटरला (एनआयसी) ऑनलाइन दर अद्ययावत करण्याचे निर्देश दिले आहेत. डुप्लिकेट ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी ऑगस्टपर्यंत 258 रुपये शुल्क आकारले जात होते. मात्र, आता नागरिकांना डुप्लिकेट लायसन्ससाठी 400 रुपये जादा म्हणजेच 658 रुपये मोजावे लागणार आहेत. परिवहन विभागाच्या निर्णयानुसार नागरिकांना आता आर्थिक फटका सहन करावा लागणार आहे.

एकाच वेळी मोठी शुल्कवाढ

परिवहन विभागाच्या आदेशानुसार शुल्क वाढ झालेली आहे. त्यानुसार पुणे, पिंपरी आरटीओत नव्या दराची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. मात्र, एकाचवेळी थेट 400 रुपयांची वाढ झाल्याने नागरिकांना आता मोठा आर्थिक फटका बसणार आहेत. येत्या काळात इतर सेवा शुल्कदेखील वाढणार का? असा प्रश्न विचारला जात आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;