कोल्हापुरात 10 वर्षांच्या मुलीची बलात्कार करून हत्या, गृहमंत्री फडणवीस यांच्या दौऱ्यावेळीच भयंकर घटना,

कोल्हापुरात 10 वर्षांच्या मुलीची बलात्कार करून हत्या, गृहमंत्री फडणवीस यांच्या दौऱ्यावेळीच भयंकर घटना,

‘लाडकी बहीण’ योजनेच्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आज कोल्हापुरात असतानाच एका दहा वर्षीय मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

कोल्हापुरातील शिये गावातील रामनगर येथे ही घटना घडली. ही मुलगी काल बुधवारी दुपारपासून बेपत्ता होती. तिचा परिसरात शोध घेऊनही ती न सापडल्याने रात्री कुटुंबीयांनी शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली.  पोलिसांनी स्थानिक रहिवाशांच्या साह्याने शिये रामनगर परिसरातील सीसीटीव्ही पॅमेरे आणि शेतातील विहिरी, ओढे, ऊसाच्या फडातही शोध घेतला. पहाटे चार वाजेपर्यंत शोध सुरू होता. मात्र काहीच सुगावा लागत नसल्याने श्वान पथक आणण्यात आले. त्यानंतर काही वेळातच घरापासून अवघ्या अर्धा किलोमीटर अंतरावर उसाच्या फडात या मुलीचा मृतदेह आढळून आला. तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;