एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलली; विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा दणका

एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलली; विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा दणका

आयबीपीएसची परीक्षा तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे येत्या रविवारी (दि. 25) होणारी  राज्य सेवा संयुक्त पूर्व परीक्षा एकाच दिवशी येत असल्याने ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय आज आयोगाने घेतला. ही परीक्षा पुढे ढकलावी यासाठी स्पर्धा परीक्षार्थींचे गेल्या तीन दिवसांपासून शास्त्री रस्त्यावर आंदोलन सुरू आहे. दरम्यान, या परीक्षेत पृषी सेवेतील जागांचाही समावेश करावा, या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी आपले आंदोलन सुरूच ठेवण्याची घोषणा केली आहे.

पुढे ढकलण्यात आलेल्या परीक्षेत पृषी विभागाच्या 258 जागांचादेखील समावेश करावा. या 258 जागांसाठी परीक्षा घेण्याचे नोटिफिकेशन काढावे, अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे. तोपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा विद्यार्थ्यांचा निर्णय आहे. पृषी विभागाच्या जागांबाबत जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार आहे, अशी भूमिका विद्यार्थ्यांनी स्पष्ट केली आहे. त्यामुळे दोन मागण्यांपैकी एक मागणी मान्य झाली असली तरी दुसऱया मागणीसाठी हे आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय विद्यार्थ्यांनी घेतला आहे. आज सलग तिसऱया दिवशीही विद्यार्थ्यांनी ठिय्या मांडला. दुपारनंतर आलेल्या पावसातही हे आंदोलन सुरूच होते.

 

सर्वसमावेशक परीक्षा शक्य

कृषी सेवेतील 258 पदांचा समावेश याच परीक्षेत करण्याची स्पर्धा परीक्षार्थींची मागणी आहे. स्पर्धा परीक्षार्थींनी आक्रमक भूमिका घेत मंगळवारी रात्रीपासून शास्त्री रस्ता येथे ठिय्या आंदोलन सुरू केले. महाराष्ट्र पृषी सेवा गट अ, ब आणि ब (कनिष्ठ) संवर्गासाठीची परीक्षा ऑक्टोबरमध्ये घेण्यात येणार असल्यास ही पदे राज्यसेवा परीक्षेमध्ये समाविष्ट करून ऑक्टोबरमध्ये एकत्रित सर्वसमावेशक राज्यसेवा परीक्षा घेणे शक्य आहे आणि तांत्रिकदृष्टय़ा तेच योग्य आहे, असे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;