दत्त कारखान्याच्या क्षारपड शोध प्रबंधाचे आंतरराष्ट्रीय साखर परिषदेत होणार सादरीकरण

दत्त कारखान्याच्या क्षारपड शोध प्रबंधाचे आंतरराष्ट्रीय साखर परिषदेत होणार सादरीकरण

शुगरकॉन-2024 आंतरराष्ट्रीय साखर परिषदेच्या आयोजन समितीने श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याने सादर केलेला “सब-सरफेस ड्रेनेज (एसएसडी) प्रकल्पाचा “क्षारयुक्त माती सुधारणे आणि त्याचा साखरेच्या उत्पादनावर आणि उत्पादकतेवर परिणाम” या शीर्षकाचा शोध प्रबंध स्वीकारला आहे. दि. 16 ते 19  दरम्यान आय. सी. आय. एस. एफ., क्यू न्होन, रिन्ह दिन्ह व्हिएतनाम येथे आयोजित 8 व्या आय. ए. पी. एस. आय. टी. आंतरराष्ट्रीय साखर परिषद आणि शुगरकॉन परिषदेत याचे सादरीकरण होणार आहे. ही माहिती उद्यानपंडित गणपतराव पाटील, चेअरमन रघुनाथ पाटील, व्हाईस चेअरमन शरदचंद्र पाठक यांनी पत्रकार परिषदेत दिली.

“लवचिक आणि शाश्वत जागतिक साखर उद्योग आणि जैव-ऊर्जा उद्योग: साखर क्षेत्राचे रूपांतर” या विषयावरील आगामी आंतरराष्ट्रीय परिषदेला 20 साखर उत्पादक देशांतील 250 प्रतिनिधी असतील. प्रख्यात साखर पीक तज्ज्ञ, संशोधक, साखर आणि अल्कोहोल तंत्रज्ञ यांच्यासह उद्योग व्यवस्थापक, धोरणकर्ते आणि प्रगतीशील शेतकरी उपस्थित राहणार आहेत.

पत्रकार परिषदेत संचालक इंद्रजित पाटील, महेंद्र बागे, बाळासाहेब पाटील हलसवडे, ऍड. प्रमोद पाटील, श्री दत्त भांडारचे चेअरमन दामोदर सुतार, कार्यकारी संचालक एम. व्ही. पाटील, मुख्य शेती अधिकारी श्रीशैल हेगान्ना, माती परीक्षण विभाग प्रमुख ए. एस. पाटील, अंबादास नानिवडेकर आदी उपस्थित होते.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;