शिर्डीतील ग्रामस्थांच्या आंदोलनानंतर प्रशासनाला जाग; साई मंदिराचे 4 नंबर प्रवेशद्वार केले खुले

शिर्डीतील ग्रामस्थांच्या आंदोलनानंतर प्रशासनाला जाग; साई मंदिराचे 4 नंबर प्रवेशद्वार केले खुले

शिर्डी येथील ग्रामस्थांनी केलेल्या आंदोलनानंतर प्रशासनाला जाग आली असून साई संस्थांनी मंदिर परिसरातील चार नंबरचे गेट ग्रामस्थांसाठी खुले करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या आठवड्यामध्ये शिडी ग्रामस्थांनी विविध मागण्यांसाठी या ठिकाणी आंदोलन केले होते. शिर्डी येथील मंदिरामध्ये जाण्यासाठी जे गेट बंद करण्यात आले आहे, ते तात्काळ खुले करावे, अशी प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली.

साई संस्थान मंदिर परिसराचे चारही गेट आत-बाहेर जाण्यासाठी भाविक व ग्रामस्थांना खुले करा या मागणीसाठी गेले काही दिवसांपासून ग्रामस्थांनी आंदोलन केले आहे. या आंदोलनाला बुधवारी यश आले आहे. साई संस्थानने दक्षिण बाजूचे चार क्रमांकाचे महाद्वार खुले केले आहे. मात्र महाद्वार क्रमांक तीन अद्यापही पुर्णपणे खुले झाले नसल्याने या मागण्यांचा पाठपुरावा सुरू राहिल, अशी भुमिका ग्रामस्थांनी घेतली आहे.

साईबाबा मंदिराचे चारही गेट खुले करणे, चारही गेट जवळ मोबाईल, चप्पल स्टँड, सशुल्क दर्शन पास व्यवस्था व लाडू काऊंटर असावे या मागण्यांसाठी शहर व्यापारी संघटना व ग्रामस्थ यांच्यावतीने साईसंस्थान प्रशासनास मोर्चाद्वारे निवेदन देण्यात आले होते. या मोर्चाद्वारे सदर मागण्या पूर्ण करण्यासंदर्भात संस्थान प्रशासनास 15 दिवसांचा कालावधी देण्यात आला होता. परंतु या काळात महाद्वारे खुली करण्याबाबत कारवाई झाली नव्हती. त्यामुळे माजी नगराध्यक्ष कैलासबापू कोते, शिवसेना जिल्हा प्रमुख कमलाकर कोते, किशोर गंगवाल, बाळासाहेब लुटे, निलेश कोते, संदीप पारख, सुधाकर शिंदे, दीपक वारुळे, नितीन कोते, गोगुळ ओस्तवाल, बाबासाहेब कोते, आप्पासाहेब कोते, रविंद्र गोंदकर, मनोज लोढा, विकास गोंदकर, नरेश पारख, कैलास आरणे, रविंद्र कोते, सचिन लुटे, निलेश गंगवाल आदी ग्रामस्थांच्या शिष्ठमंडळाने संस्थानचे सीईओ गोरक्ष गाडीलकर यांची भेट घेऊन मागण्यांची कैफियत मांडली. मागण्या पूर्ण न केल्यास 21 ऑगस्टपासून महाद्वार 4 समोर उपोषणास बसण्याबाबत निवेदन दिले होते.

याबाबत सीईओ गाडीलकर सकारात्मक प्रतिसाद देत महाद्वार 4 पूर्णपणे उघडण्याबाबत आणि साईउद्यान या ठिकाणी साईभक्तांच्या सुविधेसाठी पेड पास युनिट देखील सुरु करण्याबाबत निर्देश दिले. महाद्वार 3 खुले करण्यासंदर्भात संस्थानच्या संबंधित समितीशी चर्चा करून लवकरच निर्णय घेऊ, अशी ग्वाही गाडीलकर यांनी दिल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;