दर्शन मंडपासाठी 110 कोटींच्या आराखड्याला मंजुरी, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या पाठपुराव्यामुळे प्रश्न मार्गी

दर्शन मंडपासाठी 110 कोटींच्या आराखड्याला मंजुरी, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या पाठपुराव्यामुळे प्रश्न मार्गी

श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी दर्शन मंडप व स्काय वॉक उभा करण्यासाठी तयार करण्यात आलेला 110 कोटी रुपयांचा आराखडा उच्च अधिकार समितीने मंजूर केला आहे. दोन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या आराखडय़ासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी आषाढी यात्रेनंतर वेगवान पाठपुरावा केला आहे. राज्याच्या मुख्य सचिव सुनीता सौनिक यांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या बैठकीत हा आराखडा समितीने मंजूर केलेला आहे.

मुंबई येथे झालेल्या बैठकीला जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्यासह जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संजय माळी, श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, सहायक जिल्हा नियोजन अधिकारी पुंडलिक गोडसे उपस्थित होते.

नुकतीच आषाढी यात्रा संपन्न झाली. यात्रेला 20 लाखांवर भाविकांची गर्दी झाली होती. दर्शन रांगेतील भाविकांचा प्रतीक्षा कालावधी कमी करण्यासाठी तिरुपती बालाजी दर्शन व्यवस्थेच्या धर्तीवर श्री विठ्ठल दर्शनासाठी टोकन दर्शन पद्धती लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी आवश्यक दर्शन मंडप आणि दर्शन रांगेतील स्काय वॉकचा आराखडा दोन वर्षांपासून प्रलंबित आहे. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी यात्रा झाल्यानंतर या आराखडय़ाचा पाठपुरावा युद्धपातळीवर केला. जिल्हास्तरीय समितीने मान्यता दिल्यानंतर 16 ऑगस्ट रोजी मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकार समितीने आराखडय़ास मान्यता दिली आहे.

दर्शन रांगेतील सुविधा

n दर्शन रांगेत भाविकांसाठी पिण्याचे पाणी, शौचालयाची सुविधा, वेटिंग हॉल, दर्शनासाठी टोकन घेण्याची सुविधा, रिफ्रेशमेंट, आपत्तीमध्ये बाहेर पडण्याची व्यवस्था, हिरकणी कक्ष, दिव्यांगांसाठी सुविधा, अग्निविरोधक सुविधा, पोलीस, जेवणाची व्यवस्था, पार्ंकगची सुविधा या बाबींचा समावेश आराखडय़ात करण्यात आलेला आहे.

सप्टेंबरमध्ये मान्यता मिळण्याची शक्यता

n उच्चाधिकार समितीने मान्यता दिलेला आराखडा आता मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील राज्य शिखर समितीकडे सादर केला जाईल. सप्टेंबर महिन्याच्या मध्यापर्यंत राज्य शिखर समितीची बैठक होऊन दर्शन मंडप व स्काय वॉक आराखडय़ास अंतिम मान्यता मिळेल व त्यानंतर लवकरच शासननिर्णय निघेल, अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली.

श्री विठ्ठलाच्या दर्शन रांगेत कायमस्वरूपी व्यवस्था करण्याच्या दृष्टीने स्कायवॉक व दर्शनहॉल बांधकाम आराखडय़ासंदर्भात मंदिर समितीने 2018 मध्ये तत्कालीन अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांच्या अध्यक्षतेखालील सभेत ठराव केला होता. त्यासाठी बेरी आर्किटेक्ट, कोल्हापूर यांची नियुक्ती केली आहे. या आराखडय़ास कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग, पुणे यांची तांत्रिक मान्यता घेतली आहे.

– गहिनीनाथ महाराज औसेकर, सह अध्यक्ष

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;