अमेरिकन कंपनी 13 वर्षांची लढाई हरली, पुण्याचा बर्गर झाला ‘किंग’!

अमेरिकन कंपनी 13 वर्षांची लढाई हरली, पुण्याचा बर्गर झाला ‘किंग’!

पुण्यातील ‘बर्गर किंग’कडून अमेरिकेतील ‘बर्गर किंग कॉर्पेरेशन’च्या नावाचा गैरवापर करण्यात आला नाही. बर्गर किंग कायदेशीर आणि प्रामाणिकपणे व्यवसाय करत असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवून ‘बर्गर किंग कॉर्पेरेशन’ने दाखल केलेला दावा निकाली काढला. लष्कर भागातील बर्गर किंगने बर्गर किंग कॉर्पेरेशनविरुद्ध 13 वर्षे सुरू असलेली न्यायालयीन लढाई जिंकली.

समान नावावरुन लष्कर भागातील ‘बर्गर किंग’ आणि अमेरिकेतील ‘बर्गर किंग कॉर्पेरेशन’ यांच्यात वाद होता. ‘बर्गर किंग कॉर्पेरेशन’ने दाखल केलेल्या खटल्यात जिल्हा न्यायाधीश सुनील वेदपाठक यांनी ‘बर्गर किंग’च्या बाजूने निकाल दिला. अमेरिकेच्या ‘बर्गर किंग कॉर्पेरेशन’ने भारतातील प्रतिनिधी पंकज पाहुजा यांच्यामार्फत ‘मेसर्स बर्गर किंग’चे मालक अनाहिता आणि शापूर इराणी यांच्याविरुद्ध दिवाणी दावा दाखल केला होता. व्यापारचिन्ह उल्लंघन, नुकसान भरपाई, पुण्याच्या बर्गर किंगला ट्रेड मार्कच्या वापरास कायमस्वरूपी मनाई, अशा प्रतिबंधक आदेशांसाठी अमेरिकेच्या ‘बर्गर किंग’कडून दावा दाखल करण्यात आला होता. ‘बर्गर किंग’च्या वतीने ऍड. ए. डी. सरवटे, ऍड. सृष्टी आंगणे, ऍड. राहुल परदेशी यांनी बाजू मांडली.

अमेरिकेतील फ्लोरिडात ‘बर्गर किंग’ नावाने हॉटेल सुरू केले होते. या साखळी उपाहारगृह उद्योगाच्या अमेरिकेसह जगभरात शंभराहून अधिक देशांत 13 हजार शाखा आहेत.

कंपनीला 2008 मध्ये पुण्यात सारख्याच नावाने आधीच एक उपाहारगृह सुरू केल्याची माहिती मिळाली. त्यामुळे कंपनीने जून 2009 मध्ये आपल्या वकिलांमार्फत पुण्यातील ‘बर्गर किंग’ला आपला व्यवसाय थांबवण्याची नोटीस बजावून सामंजस्याने हे प्रकरण मिटविण्याचा प्रस्ताव दिला होता.

 ‘बर्गर किंग’ हे व्यापार चिन्ह आणि व्यावसायिक नाव 1954 पासून ते वापरत आहेत. या कंपनीने 2014 पासून नवी दिल्लीत आणि नंतर मुंबई आणि पुण्यात उपाहारगृहे सुरू केली.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;