इंदापूरमध्ये नितेश राणे गो बॅक

इंदापूरमध्ये नितेश राणे गो बॅक

पुणे- जिह्यातील इंदापूरमध्ये भाजप आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज हिंदू जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, मराठा आंदोलकांनी एक मराठा लाख मराठा, मनोज जरांगे तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है.. नितेश राणे गो बॅक, अशी घोषणाबाजी करत राणेंच्या यात्रेला विरोध केला. यावेळी, पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं आहे.

इंदापूरमधील छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा वीरश्री मालोजीराजे भोसले यांच्या इंदापूरमधील गढीवरील अतिक्रमण हटवण्यासाठी हिंदू जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. त्यामध्ये आमदार नितेश राणे, ह.भ.प.संग्राम बापू भंडारे पाटील, सागर भैया बेग यांच्या उपस्थितीत हा मोर्चा काढण्यात आला.

राणे यांचा मोर्चा मुख्य बाजारपेठेत आल्यानंतर सकल मराठा समाजाचे आंदोलक जात असताना त्यांना पोलिसांनी अडवले. तसेच, जवळपास दहा आंदोलकांना ताब्यात देखील घेतले आहे. आश्रम फरतडे नावाच्या सकल मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्याला ताब्यात घेतले. तसेच, इंदापूर नगरपरिषदेसमोर सुरू असलेल्या हिंदु जन आक्रोश मोर्चा सभा सुरू असताना प्रेक्षकात बसलेल्या कार्यकर्त्यांनी घोषणाजी केली.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;