पुण्यात लाडक्या बहिणींचे अन्न-पाण्याविना हाल, महिलांना रस्त्यावर बसण्याची वेळ

पुण्यात लाडक्या बहिणींचे अन्न-पाण्याविना हाल, महिलांना रस्त्यावर बसण्याची वेळ

‘लाडकी बहीण योजना’ कार्यक्रमाला गर्दी जमविण्यासाठी मिंधे सरकारकडून पुणे, पिंपरी-चिंचवड आणि जिह्यातून 700वर बसेसमधून महिलांना आणण्यात आले होते. सकाळी 10 वाजल्यापासून महिला कार्यक्रमस्थळी आल्या होत्या. कार्यक्रम सुरू झाला दुपारी दोन वाजता. तोपर्यंत महिलांना हॉलमध्ये सोडत नव्हते. त्यामुळे महिला ताटकळत बाहेर थांबल्या होत्या. तसेच जेवण-पाणी मिळाले नाही. त्यामुळे महिला संतापल्या होत्या. मुख्यमंत्र्यांच्या भाषणावेळी महिला उपाशीपोटी निघून गेल्या.

बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे मिंधे सरकारकडून ‘लाडकी बहीण वचनपूर्ती सोहळ्या’चे आयोजन करण्यात आले होते. या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार व इतर सहकारी मंत्री, आमदार उपस्थित होते.

मिंधे सरकारकडून मोठा गाजावाजा करून या कार्यक्रमाचे आयोजन केले होते; परंतु नियोजन नसल्याने महिलांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. दुपारी दोन वाजता कार्यक्रमाचे आयोजन केले होते; परंतु यासाठी सकाळी आठ-नऊ वाजल्यापासूनच महिलांना कार्यक्रमाच्या ठिकाणी आणण्यात आले. त्यामुळे ठाण मांडून बसलेल्या महिला कंटाळून गेल्या होत्या. मुख्यमंत्र्यांचे भाषण सुरू झाल्यावर महिला हळूहळू निघून गेल्या.

लहान मुलेही उपाशी

जिह्यातून सकाळी आठ वाजता निघालेल्या महिलांना दुपारी तीन वाजेपर्यंत जेवण न मिळाल्याने उपाशीपोटी माघारी जावे लागले. तसेच काही महिलांसोबत त्यांची लहान मुलेही आली होती. त्यांच्यावरही उपाशी राहण्याची वेळ आली. या वेळी अनेक महिलांनी तीव्र संताप व्यक्त केला.

बॅडमिंटन हॉलची मर्यादा सहा हजार असताना जवळपास 14 ते 15 हजार महिलांना कार्यक्रमाला आणले होते. त्यामुळे महिलांची गर्दी झाली होती. जागा पकडण्यासाठी महिलांना आटापिटा करावा लागला. अनेक महिलांवर दुसऱ्या सभागृहात बसून केवळ स्क्रीनवर कार्यक्रम बघण्याची वेळ आली.

मिंध्यांकडून बहिणींना याचना

‘‘लाडक्या बहिणींकडून आशीर्वाद मिळाले की, त्यांना दीड हजार रुपयांवरून दोन हजार, अडीच हजार… आणि अधिक बळ मिळाले की, तीन हजार रुपये ओवाळणी म्हणून देण्यात येतील. परंतु बहिणींनी आता ठरवायचे आहे. याची जबाबदारी तुमच्यावर आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत तुम्ही काय निर्णय घेता, यावर अवलंबून आहे. तुमच्यासाठी आम्ही काहीही करायला तयार आहोत; परंतु सत्ता द्या,’’ अशी याचना मिंध्यांकडून ‘लाडक्या बहिणीं’ना करण्यात आली.

धमकी देऊन महिलांना बोलावले

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ सरकारने मोठ्या थाटामाटात केला असला तरी या योजनेसाठी महिलांना धमक्या देऊन बोलावल्याचा गौप्यस्फोट राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज केला. या संबंधीचे चॅट आपल्याकडे असल्याचेही त्यांनी जळगावमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. या सगळ्या परिस्थितीत माझ्याकडे एक मेसेज आला. सरकारमधले काही लोक महिलांना धमकी देत होते. जर तुम्ही कार्यक्रमाला हजर राहीला नाही तर, योजनेतून तुमचं नाव रद्द करण्यात येईल, अशा धमक्या सरकारमधील काही लोकांनी महिलांना दिल्या. हे अयोग्य आहे. सरकार ज्या पद्धतीने स्वतःचे कार्यक्रम मोठे करण्यासाठी जे काही करतंय ते अतिशय अयोग्य आहे. आणि इतकं असंवेदनशील सरकार असेल असं मला वाटलं नव्हतं, असा टोलाही त्यांनी लगावला.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;