ऍसिड टाकून कडुलिंबाचे  पुरातन झाड जाळण्याचा प्रयत्न, कर्जतमध्ये तीक्र पडसाद; नागरिकांचे आंदोलन

ऍसिड टाकून कडुलिंबाचे  पुरातन झाड जाळण्याचा प्रयत्न, कर्जतमध्ये तीक्र पडसाद; नागरिकांचे आंदोलन

अनेक पिढ्यांची साक्ष देणाऱ्या कडुलिंबाचे पुरातन झाड ऍसिड टाकून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याच्या घटनेचे शहरात तीक्र पडसाद उमटले आहेत. या घटनेचा पर्यावरणप्रेमींनी निषेध केला आहे. तर, सामाजिक संघटनांनी आंदोलन करीत या घटनेला जबाबदार असणारे बापू सदाशिव मैड (रा. गदादेनगर, कर्जत) याच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

कर्जत शहरातील बाजारतळ येथे शंभर वर्षांचे जुने कडुलिंबाचे झाड आहे. या झाडाखाली बसून अनेकांनी छोटे-मोठे व्यवसाय सुरू केले.  हजारो नागरिकांना उष्णतेमध्ये आपली शीतल छाया दिली. मात्र, स्वतःच्या फायद्यासाठी झाड जाळण्याच्या घटनेबद्दल पर्यावरणप्रेमींमध्ये संतापाची लाट पसरली आहे.

शेकडो वर्षे अनेकांना सावली देणारा कडुलिंब अनेकवेळा प्रयत्न करूनही नष्ट होत नाही, हे पाहून त्याच्यावर ऍसिड टाकून ते जाळण्याचा प्रकार करण्यात आला आहे. सर्वप्रथम खोडाची वरपर्यंत साल काढली आहे. त्यानंतर ड्रिल मशीनने झाडाला अनेक ठिकाणी छिद्र पाडून त्यामधून ऍसिड ओतण्यात आले आहे. यामुळे ऍसिड सर्वत्र पसरले असून, कडुनिंबाचे झाड जळू लागले आहे.

या घटनेची नगरपंचायत, वन विभाग, पोलीस प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन दोषी व्यक्तीला तत्काळ अटक करावी, अशी मागणी सामाजिक संघटनांना, रोटरी क्लब ऑफ कर्जत सिटी आणि पर्यावरणप्रेमींनी केली आहे. दरम्यान, कारवाई झाली नाही तर नागरिकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;