भिंगार कॅम्प पोलिसांची कारवाई, आर्मीत नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक करणारा ताब्यात

भिंगार कॅम्प पोलिसांची कारवाई, आर्मीत नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक करणारा ताब्यात

आर्मीमध्ये नोकरीचे आमिष दाखवून लोकांची फसवणूक करणार्‍या आरोपीस भिंगार कॅम्प पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सहायक पोलीस निरिक्षक जगदीश मुलगीर, पोहेकॉ संदीप घोडके, दीपक शिंदे, रवी टकले, मिसाळ, प्रमोद लहारे यांनी ही कारवाई केली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली महिती अशी की, सन 2023 मध्ये विजय बीस्ट (रा. वाकोडी फाटा, ता. नगर) याने आर्मीमध्ये सिव्हील डिफेन्स, एम.टी.एस. कुक, क्लर्कमध्ये भरती करतो. माझी लष्करातील वरिष्ठ अधिकार्‍यांशी ओळख आहे, असे म्हणून फिर्यादीचा विश्‍वास संपादन करुन नोकरीस लावतो, असे म्हणून 2 लाख रुपये घेऊन त्यांची फसवणूक केली आहे. तसेच उत्तराखंड, पंजाब व नगर येथील सौरभ पटवाल, मयंक राऊत व लक्ष्मी थापा यांनाही नोकरीस लावुन देतो, असे म्हणून त्यांच्याकडून 8 लाख 30 हजार रुपये घेऊन फसवणूक केली आहे. तसेच त्यांची नगर येथील एका रूग्णालयात बनावट वैद्यकीय तपासणी केली आहे. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हे शोध पथकातील अंमलदारांनी सदर आरोपीचा शोध घेऊन त्यास ताब्यात घेतले. पुढील तपास पोहेकॉ मिसाळ हे करत आहेत.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;