मनोज जरांगे पाटील यांची उद्या नगरमध्ये शांतता रॅली

मनोज जरांगे पाटील यांची उद्या नगरमध्ये शांतता रॅली

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांची शांतता रॅली सोमवारी (12 ऑगस्ट) नगर शहरात येत आहेत. केडगाव येथे नगर शहरात रॅलीचे स्वागत होणार आहे. तेथून माळीवाडा बस स्थानक परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून शहरात रॅली काढण्यात येणार आहे. शहरात सुमारे साडेसहा किमीचे अंतर कापत चौपाटी कारंजा येथे रॅलीची सांगता होणार आहे. दरम्यान, सुमारे पाच हजार स्वयंसेवक नियोजन व व्यवस्था करत आहेत.

जरांगे पाटील पुण्याहून नगरकडे येणार आहेत. नगरच्या अखंड समाजाच्या वतीने बेलवंडी फाटा येथे जिल्ह्यात त्यांचे स्वागत होईल. तेथून सुमारे चारशे चारचाकी व एक हजार दुचाकी त्यांच्या यात्रेत सहभागी होतील. नगरकडे येताना सुपा येथेही स्वागत होईल व तेथून केडगाव येथे शहरात स्वागत होईल. रेल्वे उड्डाणपुलाजवळ नेमाने इस्टेटच्या मैदानावर वाहने लावून रॅली शहरात प्रवेश करेल. शहरात महापुरुषांच्या पुतळ्यांना अभिवादन करून चौपाटी कारंजा येथे रॅलीची सांगता होईल.

नगर जिल्ह्यासह शेजारील बीड, सोलापूर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, नाशिक जिल्ह्यातून लाखो समाजबांधव शहराच्या रॅलीत सहभागी होणार आहेत. त्यांच्यासाठी पाणी व फूड पॅकेटची व्यवस्था करण्यात येत आहे. ज्यांना सेवा, सुविधा पुरवायची आहे, त्यांनी रॅली मार्गावर पुरवावी, असे आवाहन अखंड मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.

केडगाव येथे नेमाने इस्टेट, कल्याण रस्त्यावर फटका मार्केट भरणारी जागा, शहरात क्लेरा ब्रूस मैदान न्यू आर्टस् कॉलेज, सावेडीत सारडा कॉलेज अशा विविध ठिकाणी पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. यासह अनेक ठिकाणी शहरात येणाऱ्या महामार्गाच्या दुतर्फा असलेल्या जागांवर पार्किंग करण्यात येणार असल्याचे दळवी यांनी सांगितले.

असा आहे शहरातील रॅली मार्ग
केडगाव येथे स्वागत – कायनेटिक चौक – सक्कर चौक – माळीवाडा बसस्थानक – मार्केट यार्ड चौक – माळीवाडा वेस – पंचपीर चावडी – आशा टॉकीज चौक – माणिक चौक – कापड बाजार – तेलिखुंट – चितळे रोड मार्गे – चौपाटी कारंजा (समारोप)

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;