फडणवीसांचे षड्यंत्र तोडणार; ओबीसीतून आरक्षण घेणारच! जरांगे-पाटील यांची साताऱ्यात जंगी सभा

फडणवीसांचे षड्यंत्र तोडणार; ओबीसीतून आरक्षण घेणारच! जरांगे-पाटील यांची साताऱ्यात जंगी सभा

‘मी मरायचीही तयारी ठेवली आहे. फडणवीसांनी कितीही षड्यंत्रे रचली, तरी ही षड्यंत्रे तोडल्याशिवाय गप्प बसणार नाही. ओबीसीतून आरक्षण घेणारच,’ असे प्रतिआव्हान मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी देत आज देवेंद्र फडणवीस, छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधला.

मनोज जरांगे-पाटील यांचा सध्या पश्चिम महाराष्ट्रात झंझावाती दौरा सुरू आहे. आज साताऱयातील ऐतिहासिक गांधी मैदानावर त्यांची सभा झाली. आज पोवई नाक्यावर त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. तेव्हा नाक्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून खाली उतरतानाही त्यांना इतरांची मदत घ्यावी लागली होती. जरांगे-पाटील यांना आज साताऱयात व्यासपीठावरच चक्कर आल्याने काही काळ उपस्थितांमध्ये भीती निर्माण झाली.

सरकारचा बाप आला तरी मागे हटणार नाही!

‘मराठा समाजातील गरीब लेकरांना मोठे करण्याचा माझा शब्द आहे. सरकार नाय, त्याचा बाप येऊ द्या, मी एक इंचही मागे हटणार नाही. तुम्ही काळजी करू नका. मी मरायची अन् खेटायचीही तयारी ठेवली आहे. मराठय़ांना ओबीसीतून आरक्षण दिल्याशिवाय मागे हटणार नाही,’ असा निर्धार जरांगे-पाटील यांनी व्यक्त केला.

पावसाळय़ात दोन महिने मासेमारी बंद असल्यामुळे बोटी किनाऱयावर शाकारल्या होत्या. नारळी पौर्णिमेला पारंपरिक पद्धतीने समुद्राला नारळ अर्पण करून पुन्हा एकदा कोळी बांधव मासेमारीला सुरुवात करणार आहेत. तत्पूर्वी बोटींची डागडुजी, रंगरंगोटी, नवीन जाळी भरणे अशी कामे सध्या सुरू आहेत.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;