हायकोर्टाने विजय औटीचा जामीन फेटाळला, कोठडीतील मुक्काम वाढला; सिव्हिल रुग्णालयातील बडदास्तही चव्हाटय़ावर

हायकोर्टाने विजय औटीचा जामीन फेटाळला, कोठडीतील मुक्काम वाढला; सिव्हिल रुग्णालयातील बडदास्तही चव्हाटय़ावर

ऍड. राहुल झावरे यांच्यावर खुनी हल्ला केल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेला पारनेरचा माजी नगराध्यक्ष विजय औटी याच्यासह इतर दोघांचे जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने आज फेटाळून लावले. उच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे विजय औटी, प्रीतेश पानमंद व मंगेश कावरे यांचा कोठडीतील मुक्काम वाढला आहे. दरम्यान, सिव्हिल रुग्णालयात उपचारांच्या नावाखाली दाखल केलेल्या विजय औटी याच्या शाही बडदास्तीचाही महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पर्दाफाश केल्याने औटीच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे.

विजय औटी, प्रीतेश पानमंद, तसेच मंगेश कावरे यांचे जामीन अर्ज नगरच्या न्यायालयाने फेटाळल्यानंतर तिघांच्या वतीने खंडपीठात जामीन अर्ज दाखल करण्यात आले होते. आज त्यावर सुनावणी झाली. आरोपींच्या वकिलांनी जामीन अर्ज मांडल्यानंतर फिर्यादीचे वकील राहुल करपे यांनी त्यास आक्षेप घेतला. ऍड. करपे यांनी पोलिसांनी सादर केलेला व्हिडीओ जप्त पंचनामा वाचून दाखविला. ही घटना आंबेडकर चौकात घडली असून, व्हिडीओ क्रॉप करून सादर केल्याचे ते म्हणाले. फ्लॅट, तसेच शॉपचे बनावट दस्तऐवज तयार करून नगरपंचायतदप्तरी नोंद केल्याप्रकरणी गुन्हा, शासकीय कर्मचाऱयाला मारहाण, तसेच निवडणुकीपूर्वी दाखल झालेल्या गुह्याचा संदर्भ देत ऍड. करपे यांनी औटी याची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. औषधोपचारांच्या नावाखाली रुग्णालयात दाखल होऊन औषधोपचारांची गरज नाही, हे आरोपी औटी याने स्वतः लिहून दिले आहे. यावरून हा आरोपी अहंकारी, प्रशासनास त्रास देणे, दडपशाही करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे ऍड. करपे यांनी सांगितले. त्यानंतर न्यायालयाने औटी याचा जामीन फेटाळून लावला.

पोटदुखीचे कारण करून शुक्रवारी (2 रोजी) पारनेरचे ग्रामीण रुग्णालय व तेथून नगरच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेल्या विजय औटी याची हॉस्पिटलमध्ये शाही बडदास्त ठेवली जात असल्याचा पर्दाफाश महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केला. काँग्रेसचे शहराध्यक्ष किरण काळे, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश पोटे व कार्यकर्त्यांनी रुग्णालयात ठिय्या आंदोलन केल्यानंतर रात्री औटी यास तेथून पारनेर येथे हलविण्यात आले, असे काळे यांनी सांगितले.

मदत करणाऱयांची चौकशी करा

आरोपी औटी फोनवर बोलतानाचा व्हिडीओ, तसेच छायाचित्रेही व्हायरल झाली आहेत. त्याला रुग्णालयात ‘व्हीआयपी’ वागणूक देण्यात आली. आजार नसताना त्याला रुग्णालयात भरती करण्यात आले. आम्ही आल्याचे समजताच औटीला रुग्णालयातून पळविण्यात आले. त्याला मदत करणाऱयांची चौकशी झाली पाहिजे. रुग्णालय प्रशासनाने सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध करून द्यावे.

– किरण काळे, शहराध्यक्ष, काँग्रेस

आंदोलनानंतर आरोपीस गायब केले

विजय औटी याला शाही वागणूक दिली जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर आम्ही सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ठिय्या दिल्यानंतर आरोपी औटी यास रुग्णालयातून गायब करण्यात आल्याचा आरोप किरण काळे यांनी केला. पुण्यातील ललित पाटील प्रकरणाची पुनरावृत्ती नगरच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये झाली आहे. भाजपचा कार्यकर्ता असलेला औटी हा कोणाचा कार्यकर्ता आहे, हे जिह्यातील जनतेला माहीत आहे. रुग्णालयातून त्याला सकाळीच डिस्जार्ज दिल्याचे सध्या नियुक्तीस असलेले डॉक्टर सांगतात, असेही काळे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

आम्ही सोडले, आरोपी गेला नाही!

आम्ही औटी यास सकाळीच सोडले होते. तो रुग्णालयातून गेला नाही. रुग्णालयात जाऊन पाहणी केली असता, त्याची पोटाची तक्रार असल्याची कागदोपत्री नोंद होती. त्याला आरोपींच्या वॉर्डात न ठेवता ऑर्थो विभागात भरती करण्यात आले होते. आपण कुठल्याही प्रकारची औषधे घेणार नाही, असे औटी याने लिहून दिले आहे.

– डॉ. संजय घोगरे, जिल्हा शल्यचिकित्सक

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;