साताऱ्यात पावसाचा जोर ओसरला; कोयनेचे दरवाजे बंद

साताऱ्यात पावसाचा जोर ओसरला; कोयनेचे दरवाजे बंद

कोयना धरण परिसरातील पावसाचा जोर कमी झाला असून, धरणात 86.4 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. धरण 81 टक्के भरले असून, धरणात सध्या 26 हजार 638 क्युसेक पाण्याची आवक होत आहे. दरम्यान, कोयना धरणाच्या दरवाजातून सुरू असलेला विसर्ग बंद करण्यात आला असून, पायथा विद्युतगृहातून 2100 क्युसेक विसर्ग कोयना नदीपात्रात सुरू आहे.

कोयना धरणातील पाण्याची आवक कमी झाल्याने धरणाच्या सांडव्यावरून विसर्ग बंद करण्यात आला आहे. गेल्या 24 तासांत कोयना परिसरात 53  मि.मी., नवजा 94 मि.मी., महाबळेश्वर 59 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून संपूर्ण सातारा जिह्यात पावसाची संततधार सुरू होती. कोयना पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसाने विश्रांती घेतली आहे. यामुळे कोयना धरणाचे दरवाजे बंद करण्यात आले आहेत. पावसामुळे विस्कळीत झालेले जनजीवन पूर्वपदावर येऊ लागले आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;