पुण्यात उद्धव ठाकरे यांचे ढोल-ताशांच्या गजरात स्वागत
ढोल-ताशांचा गजर… जेसीबीमधून फुलांची उधळण… ‘आवाज कोणाचा… शिवसेनेचा’, ‘उद्धवसाहेब आप आगे बढो… हम तुम्हारे साथ हैं’ अशा घोषणाबाजीने दणाणून गेलेला परिसर… फटाक्यांची आतषबाजी… अन् शिवसैनिकांचा एकच जल्लोष… अशा उत्साहपूर्ण वातावरणात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे पिंपरी-चिंचवड शहर शिवसेनेच्या वतीने शुक्रवारी औद्योगिकनगरीत स्वागत करण्यात आले. शिवसेनेचा शनिवारी पुण्यात ‘शिवसंकल्प मेळावा’ होणार आहे. या मेळाव्यासाठी उद्धव ठाकरे हे शुक्रवारी पुण्यात दाखल झाले आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List