साताऱ्यात पर्यटनस्थळांवर हुल्लडबाजी करणाऱ्या पर्यटकांवर कारवाई, तहसीलदार अनंत गुरव यांची माहिती

साताऱ्यात पर्यटनस्थळांवर हुल्लडबाजी करणाऱ्या पर्यटकांवर कारवाई, तहसीलदार अनंत गुरव यांची माहिती

सातारा जिल्ह्यात अतिकृष्टी होत असल्याने पर्यटनस्थळांकर बंदी घालण्यात आली असतानादेखील काही पर्यटक हुल्लडबाजी, दंगामस्ती व कायद्याचे उल्लंघन करत असल्याने त्यांच्यावर पोलिसांकडून कडक कारवाई केली जात असल्याची माहिती तहसीलदार अनंत गुरव यांनी दिली. पावसाचा जोर कायम असून, नागरिकांना पर्यटनस्थळे पाहण्यास बंदी आहे. पर्यटनस्थळांकर जाऊ नये; अन्यथा जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे पालन करत कडक कारवाई केली जाईल, असा इशारा पोलीस निरीक्षक अविनाश कवठेकर व कोयनानगरचे पोलीस निरीक्षक संदीप शितोळे यांनी दिला आहे.

सातारा जिल्ह्यात जोरदार पर्जन्यवृष्टी होत आहे. या पार्श्वभूमीवर भविष्यात कोणत्याही प्रकारचा अनर्थ घडू नये म्हणून जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी पाटण तालुक्यातील ओझर्डे, नवजा, सडा वाघापूर धबधबा व तालुक्यांतील इतर पर्यटनस्थळे पाहावयास तात्पुरती बंदी घातली आहे. हे आदेश डावलून पर्यटक हुल्लडबाजी करत असतील तर त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशा सूचनाही जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिल्या होत्या. त्या अनुषंगाने पाटण तालुक्यात कुठेही हुल्लडबाजी करताना अनुचित प्रकार घडू नये म्हणून पाटणचे उपविभागीय अधिकारी सुनील गाढे, तहसीलदार अनंत गुरव यांनी संबंधित पोलीस यंत्रणेला अशा हुल्लडबाज पर्यटकांवर कडक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने पाटणचे पोलीस निरीक्षक अवनाश कवठेकर व कोयनानगरचे पोलीस निरीक्षक संदीप शितोळे यांच्या मार्गदर्शनाखाली सडा काघापूर येथे उलटा धबधबा व नवजा येथील ओझर्डे धबधबा तसेच इतर पर्यटनस्थळे पाहण्यासाठी आलेल्यांकडून कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून तेथे ये-जा करणाऱ्या अनेकांवर ड्रंक अँड ड्राईव्ह तसेच पर्यटनाला बंदी असतानादेखील या ठिकाणी आल्याने त्यांच्याकर कडक कारवाई करण्यात आली आहे.

यावेळी सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र सदगर, सहायक पोलीस हकालदार ए. एम. गलांडे, वाहतूक पोलीस हनुमंत नलकडे, राजेंद्र मोहिते, पोलीस हवालदार एस. डी. काशिद, होमगार्ड किशोर मोहिते यांच्यासह पोलीस कर्मचारी, होमगार्ड या कारवाईत सहभागी झाले होते.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;